सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा वाढ, आज सोन्याचा दर काय?

0
690

सोन्या चांदीची (Gold Silver) खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. पुन्हा सोन्या चांदीच्या दरात वाढ झाली आहे. हा खरेदीदारांना सणा सुदीच्या काळात मोठा झटका आहे. महागाईच्या आकडेवारी जाहीर होण्यापूर्वीच MCX वर सोन्या-चांदीच्या किंमती वाढल्या आहेत. जाणून घेऊयात कोणत्या शहरात सोन्या चांदीला किती दर मिळत आहे.

MCX वर, सकाळी सोन्याच्या दरात सुमारे 0.20 टक्क्यांची वाढ दिसून आली. फ्युचर्स ट्रेडिंगमध्ये सकाळी सोन्याचा भाव 72,059 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. डिलिव्हरीसाठी चांदीचा भावही सुरुवातीच्या सत्रात 84,107 रुपये प्रति किलोवर मजबूत होता.

मोठ्या गुंतवणूकदारांकडून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने-चांदीची खरेदी
देशांतर्गत बाजारात दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत वाढ अशा वेळी झाली आहे जेव्हा परदेशातही त्यांच्या किमती वाढल्या आहेत. आज, सुरुवातीच्या व्यापारात वाढ होण्यासाठी परदेशी वाढीला जबाबदार धरले जात आहेत. वास्तविक, अमेरिकेत किरकोळ महागाईचे आकडे जाहीर होणार आहेत. त्याआधी, बाजारातील अनिश्चितता लक्षात घेता, मोठे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने-चांदीची खरेदी करत आहेत, त्यामुळे भाव वाढले आहेत.

प्रमुख शहरांमध्ये आज सोन्याचा दर काय?
बंगळुरू: 73,519 रुपये प्रति 10 ग्रॅम
चेन्नई: 73,806 रुपये प्रति 10 ग्रॅम
दिल्ली: 73,519 रुपये प्रति 10 ग्रॅम
कोलकाता: 73,375 रुपये प्रति 10 ग्रॅम
मुंबई: 73,447 रुपये प्रति 10 ग्रॅम
पुणे : 73,231 रुपये प्रति 10 ग्रॅम

प्रमुख शहरांमध्ये चांदीचा दर काय?
चेन्नई: 91,100 रुपये प्रति किलो
मुंबई : 86,100 रुपये प्रति किलो
दिल्ली: 86,100 रुपये प्रति किलो
कोलकाता: 86,100 रुपये प्रति किलो
पाटणा: 86,000 रुपये प्रति किलो

भविष्यातही भाव चढे राहण्याची शक्यता
आगामी काळात मौल्यवान धातूंच्या (सोने आणि चांदी) किंमती वाढू शकतात, असे जाणकारांचे मत आहे. येत्या काही दिवसांत अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात कपात केली जाऊ शकते, त्याचा फायदा सराफांना होऊ शकतो. लग्नसराईचा हंगाम सुरू झाल्याने येत्या काही दिवसांत देशांतर्गत बाजारात नवीन मागणी येऊ शकते. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळं सर्वसामान्य लोकांना सोन्या चांदीची खरेदी करणं देखील अवघड झालं आहे. वाढत्या दरामुळं सोनं खरेदी करावं की नको असा प्रश्न नागरिकांच्या मनात उपस्थित होत आहे. त्यामुळं सोन्या चांदीचे दर कमी कधी होणार असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जातोय.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here