केईएम रुग्णालयात रुग्णांच्या रिपोर्ट पेपरचा वापर केला जातोय प्लेट बनवण्यासाठी

0
140

मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केईएम रुग्णालयातील एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. रुग्णांच्या रिपोर्टकार्डचे पेपर प्लेट्स छापल्याचा दावा किशोरी पेडणेकरांनी व्हिडीओमध्ये केला आहे. तसेच, या प्रकरणी चौकशी करण्याची मागणीही किशोरी पेडणेकरांनी केली आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी केईएम रुग्णालयात धडक दिली. तसेच, किशोरी पेडणेकरांनी केईएमम रुग्णालय प्रशासनाशी चर्चादेखील केली.

रुग्णांच्या रिपोर्ट पेपरचा वापर रुग्णालयातील पेपर प्लेटसाठी करण्यात आल्याचा प्रकार समोर आल्यानंतर याप्रकरणी सहा अधिकारी कर्मचाऱ्यांना कारणं दाखवा नोटीस पाठवल्याची माहिती केईएम रुग्णालय प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली आहे.

रुग्णांच्या रिपोर्ट्स पेपर्सच्या पेपर प्लेट्स तयार करण्यात आल्याचा व्हिडीओ किशोरी पेडणेकर यांनी ट्वीट करून काल हे प्रकरण समोर आणलं आहे. या प्रकरणाबाबत माहिती तसेच चौकशी करण्यासाठी किशोरी पेडणेकर केम रुग्णालय प्रशासनाशी चर्चा केली. रुग्णांचे रिपोर्ट कार्ड गोपनीय असतात. मात्र, त्याचे पेपर प्लेट्स छापण्यात आले आहेत, यावरून प्रश्न उपस्थित केले. या सगळ्या प्रकरणाची गंभीर दखल घेत रुग्णालय प्रशासनानं सहा अधिकारी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. या सगळ्या प्रकरणावर कोर्टात पीआयएल दाखल करणार असल्याची माहिती किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे

शिवडी विधानसभेचे आमदार अजय चौधरी बोलताना म्हणाले की, “केईएममध्ये स्थिती भयंकर आहे. अधिकाऱ्यांवर कुठलाही अंकुश नाही. कारण नगरसेवक नाही, बीएमसी आरोग्य समिती नाही, वॉर्ड दुरुस्त नाही, अनेक कमतरता आहेत. दोन महिन्याचा आधी वेळ दिला होता. पण काही झालं नाही, औषधं नाहीत. कोट्यवधी रुपयांचा बजेट असलेली महापालिका आरोग्याकडे दुर्लक्ष देत आहे. डॉक्टरांची अजून पदे भरली नाही, कमी स्टाफ आहे. MRI मशीन आणण्याचा फायनल झाली अजूनही मशीन आली नाही. हा रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचं काम करतंय.”

“हा प्रकार म्हणजे, रुग्णांच्या जीवाशी खेळ आहे. AMC हे याला जबाबदार आहे. सगळ्या महापालिका रुग्णलयांमध्ये ही परिस्थिती आहे. सिस्टीम बरबटून टाकली आहे. मंत्री महोदय मंगळवारी बैठक लावणार आहेत. त्यात दूध का दूध पाणी का पाणी होईल.”, असं आमदार अजय चौधरी म्हणाले आहेत.

माजी महापौर किशीरी पेडणेकर बोलताना म्हणाल्या की, “केईएम रुग्णालयाला 100 वर्ष होतील. एवढं जुनं रुग्णालय आहे. यात एक गंभीर बाब समोर आली आहे. पेपर प्लेटसाठी रुग्णांच्या रिपोर्टचे कागद वापरले आहेत. त्यात दोन नियम पाळले नाहीत. एक तर रुग्णांची गुप्त असलेली माहिती या रिपोर्टमधून पेपर प्लेटच्या माध्यमातून नावासकट समोर येत आहे. सोमवारी यासंदर्भात PIL दाखल होणार आहे. डीन यांनी सांगितलं की, 6 जणांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.”

AMC सुधाकर शिंदे यांच्या मागे कोण आहे? वय उलटून गेलंय त्यांचं, तरी सुद्धा तुम्ही नोकरीला ठेवलं आहे. अरेरावी मुंबईत खपवून घेतली जाणार नाही, असं माजी महापौर किशीरी पेडणेकर म्हणाल्या आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here