पुण्यातील रिक्षा चालकाने सुरु केली अंधव्यक्ती आणि गर्भवती महिलांसाठी मोफत राइड

0
86

पुणे शहर हे नेहमीच चर्चेत राहते. गुन्हेगारी तर कधी विचित्र घटनेमुळे चर्चा तर होतच राहते. सोशल मीडियावर वेगवेगळ्या व्हिडिओमुळे पुण्यातील नवनवीन गोष्टीची माहिती मिळत असतं. त्यात एक फोटोची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. पुण्यातील एका ऑटो रिक्षा चालकाने मोफत राईटची सेवा सुरु केली आहे. हा फोटो पाहून नेटकऱ्यांनी चालकाचे भरपूर कौतुक केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एक्स वापरकर्ता अमित परांजपे यांनी गुरुवारी ऑटो रिक्षाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. ऑटो रिक्षाच्या मागच्या बाजूस अंध, अपंग आणि गरोदर महिलांसाठी २ किलोमीटरपर्यंत मोफत प्रवासाचा संदेश रिक्षा चालकाने लिहला आहे. हा फोटो पाहून नेटकऱ्यांनी चालकाचे कौतुक केले आहे.

एका वापकर्त्याने लिहले आहे की, खऱ्या अर्थाने हा चालक सज्जन आहे. तर दुसऱ्याने लिहले आहे की, माणुसकी अजूनही जिवंत आहे. तिसऱ्या वापरकर्त्याने लिहले आहे की. हे आजकाल पाहणे दुर्मिळ आहे. पुण्यातील हा रिक्षा चालक औंध परिसरात दिसला आहे. आता पर्यंत या फोटोला भरपूर जणांनी लाईक्स आणि कमेंट केले आहे.

पाहा फोटो: