माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : सध्याच्या राजकारणामध्ये फुले,शाहू, आंबेडकर हे फक्त भाषणापूरते उरले असून महाराष्ट्र राज्य पुरोगामी आहे असे म्हटले जाते मात्र हे थोतांड असून राज्यात प्रचंड जातीयवाद भरला असल्याची टीका करत याबाबत आता आपल्याला काम करून ही परिस्थिती बदलावी लागेल असा इरादा आमदार गोपीचंद पडळकर यांनी आटपाडी येथे आयोजित कार्यक्रमात केला.
जत विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्याबद्दल आटपाडीचा भूमिपुत्र म्हणून आमदार गोपीचंद पडळकर यांचा आटपाडीच्या नागरिकांच्या वतीने भव्य नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमांमध्ये त्यांनी राज्यात सध्या सुरू असणाऱ्या राजकीय वातावरणावर भाष्य केले.
यावेळी बोलताना त्यांनी, महायुती म्हणून शासनाने राबवलेल्या विविध योजना व आठरा पगड जाती जमातीच्यासाठी उभारण्यात आलेली महामंडळे, विद्यार्थ्यांच्या साठी असणाऱ्या योजना याबाबत माहिती दिली. महायुती सरकारने व विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी समाजासाठी, मराठा समाजासाठी भरीव योगदान दिले असल्याचे म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मी मागणी केली आहे, आदी सत्तेचे व संस्थेचे विकेंद्रीकरण जो पर्यंत होत नाही.तोपर्यंत सर्वसमाजाला न्याय मिळणार नाही. त्यासी काम करावे लागणार आहे. याचबरोबर अन्य उपेक्षित समाजा तील विद्यार्थ्यांसाठी विविध संस्था स्थापन करण्याची मागणी शासनाकडे करणार असल्याचे सांगितले या संस्थेच्या माध्यमातून मुलांच्या मध्ये शैक्षणिक आर्थिक, सामाजिक व राजकीय क्रांती होणार आहे. संपूर्ण राज्यात आपल्याला काम करायचे आहे. सर्व समाजातील घटकांना न्याय मिळवून देण्यासह पालात राहणाऱ्या नागरिकांच्यासाठी काम करणार असल्याचे प्रतिपादन केले.
देवेंद्र फडणवीस विरोधकांना पुरून उरणारे नेतृत्व
देवेंद्र फडणवीस हे सर्व विरोधकांना पुरून उरणारे नेतृत्व आहे. 2019 ला विश्वासात करून अनैसर्गिक सरकार स्थापन झाले होते. त्यावेळी सर्व भाजपाचे आमदार कट्टर राहिले कोणीच वेगळा विचार केला नाही. कारण आमचा नेता देवेंद्र फडणवीस खमका आहे. माझ्यासाठी देवाभाऊ श्रीकृष्ण आहेत. तर त्याचा शब्द भगवतगीतेमधील उपदेश असल्याचे प्रतिपादन आम. गोपीचंद पडळकर यांनी केले.