आधार कार्डधारकांसाठी महत्त्वाची सूचना : “या” तारखेपर्यंत करा अपडेट, अन्यथा लागेल शुल्क

0
365

UIDAI ची सेवा फक्त ऑनलाइन मोफत; केंद्रावर गेल्यास भरावा लागेल ५० रुपयांचा खर्च

माणदेश एक्सप्रेस न्यूज|नवी दिल्ली : आधार कार्डधारकांसाठी एक महत्त्वाची सूचना देण्यात आली असून, ज्यांनी मागील १० वर्षांत आधारवरील माहिती अद्ययावत (अपडेट) केलेली नाही, त्यांनी १४ जून २०२५ पूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करावी. अन्यथा, ही सेवा मोफत मिळणार नाही आणि त्यासाठी अतिरिक्त पैसे भरावे लागतील, असा इशारा युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने दिला आहे.

 

२०१६ मधील ‘आधार नोंदणी आणि अद्यतन नियमां’नुसार, आधार कार्ड जारी केल्यानंतर दर दहा वर्षांनी ओळख व पत्त्याचा पुरावा अद्ययावत करणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया ऑनलाइन https://myaadhaar.uidai.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर विनामूल्य केली जाऊ शकते. मात्र, मुदत संपल्यानंतर ही सेवा फक्त आधार केंद्रांवर उपलब्ध राहील आणि त्यासाठी ५० रुपये शुल्क आकारले जाईल.

ऑनलाइन मोफत अपडेट प्रक्रिया – सोप्या टप्प्यांमध्ये:

https://myaadhaar.uidai.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.

‘Login’ बटणावर क्लिक करून आपला आधार क्रमांक व कॅप्चा कोड भरा.

OTP टाकून लॉगिन करा.

‘Document Update’ या पर्यायावर क्लिक करा.

ओळख (ID Proof) व पत्त्याचे (Address Proof) कागदपत्र निवडा व अपलोड करा.

सबमिट केल्यानंतर तुम्हाला Service Request Number (SRN) मिळेल.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here