मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची महत्त्वाची बैठक; कोणत्या मुद्द्यावर होणार चर्चा?

0
132

 

राज्यात अनेक घडामोडी घडत आहेत अशातच आज मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackrey) आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची महत्त्वाची बैठक होत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackrey) यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची त्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट घेण्यासाठी आले आहे. या महत्त्वाच्या बैठकीला मनसे नेते बाळा नांदगावकर, आमदार राजू पाटील, मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई, प्रवक्ते संदीप देशपांडे आणि इतर पदाधिकारी उपस्थित आहेत.

त्याचबरोबर राज्य प्रशासनातील मुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, गृहनिर्माण विभागाच्या प्रधान सचिव वलसा नायर सिंह, जलसंपदा विभागाचे अप्पर मुख्य सचिव सचिव दीपक कपूर, एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर,तसेच गृह विभाग वित्त विभाग, एमएमआरडीए आणि इतर विभागांचे अधिकारी उपस्थित आहेत. या भेटीमध्ये मुंबईतील बीडीडी चाळ पुनर्विकास, पोलीस वसाहतींचा पुनर्विकास, घरांची उपलब्धता विविध विषयांवर बैठक आयोजित करण्यात आली आहे. यासाठी राज्य प्रशासनातील वरिष्ठ अधिकारीही उपस्थित आहेत.

राज ठाकरे (Raj Thackrey) आणि मुख्यमंत्री (Eknath Shinde) भेटीत या घटकांवर चर्चा होण्याची शक्यता
– उरण येथे यशश्री शिंदे या तरुणीची झालेली हत्या, हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवावे अशी मागणी राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करणार आहेत.
– ⁠आरक्षण आणि जातीवाद या विषयावर देखील राज ठाकरे मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहेत.
– राज्यात महिलां संदर्भात निर्माण झालेला कायद्या सुव्यवस्थेचा प्रश्न
– पुण्यात आलेला पुर, शहरांचा नियोजन वाढती बांधकामे, पाणी व्यवस्थापन आणि राज्यात रखडलेले महत्वाचे प्रकल्प या विषयावर देखील राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहेत.
– वरळी पोलिस कॅम्प निवृत्ती कर्मचारी भाडेवाड समस्या
– वरळी गोमाता नगर पुर्नविकास प्रकल्प
– बुधवळ जि जळगाव पंतप्रधान आवास योजना यासह अन्य विषयांवर राज ठाकरे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार

उरण येथील यशश्री शिंदे हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टावर चालवा
उरण येथे यशश्री शिंदे या तरुणीची हत्या करण्यात आली आहे. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे, अशी मागणी राज ठाकरेंनी (Raj Thackrey) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे केली आहे. यासह राज्यभरातील महत्वाच्या घटकांर या दोन नेत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here