मेष राशी
तुमच्यासाठी आज फार लाभदायक असेल. नवीन वर्षाची सुरुवात धनलाभाने होईल. व्यवसायात तुम्हाला आनंददायी बातमी ऐकायला मिळेल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. दिवस आत्मविश्वासाने परिपूर्ण असेल. कुटुंबात सलोख्याचे वातावरण राहील. प्रवासाचे योग संभावतात.
वृषभ राशी
नोकरीत बढतीची संधी मिळू शकते. जवळच्या व्यक्तीकडून मोलाची मदत होईल. मानसन्मान मिळेल. उत्पन्न वाढेल. यामुळे मानसिक समाधान मिळेल. तुमचा जोडीदार तुमच्या कामात तुमची पूर्ण साथ देईल. कुटुंबासोबत धार्मिकस्थळी जाऊ शकता.
मिथुन राशी
आजचा दिवस नेहमीपेक्षा थोडा वेगळा असेल. आज एखाद्या कार्यक्रमाला जाण्याचा योग आहे. तुमची एखाद्या जुन्या मित्राशी गाठ-भेट होईल. तसेच आज थोड्या मेहनतीने मोठा फायदा होईल. प्रेमी युगुलांसाठी आजचा दिवस चांगला आहे. प्रगतीच्या संधी मिळू शकतात. भावनांवर नियंत्रण ठेवा.
कर्क राशी
आजचा दिवस तुमच्यासाठी भाग्यदायी असेल. वर्षाच्या पहिल्याच दिवशी तुम्हाला एखादी मोठी ऑर्डर मिळेल. यामुळे तुमची आर्थिक बाजू सुधारेल. तुम्ही आज एखादी संपत्ती खरेदी करण्याचा विचार करु शकता. शेअर बाजारात गुंतवणूक केल्याने फायदा संभवतो. एखाद्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल, ज्यामुळे मानसिक शांतता मिळेल.
सिंह राशी
आज तुम्हाला जोडीदाराकडून अनपेक्षित भेटवस्तू मिळेल. ज्यामुळे तुमचा आजचा दिवस आनंदात जाईल. धार्मिक कार्यात रुची वाढेल. नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली संधी चालून येईल आणि तुम्ही या संधीचे सोनं कराल. भावनांवर नियंत्रण ठेवा. उत्पन्न वाढेल. आरोग्याची काळजी घ्या.
कन्या राशी
आजचा दिवस तुमच्यासाठी भाग्यदायी असेल. नवीन गुंतवणूक करता येईल. त्यातून चांगला नफा मिळेल. एखाद्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. आज तुमच्या मनात नकारात्मक विचार आणू नका. सामाजिक स्तरावर कौतुक होईल. प्रवास करावा लागेल. वाहने जपून चालवावी.
तुळ राशी
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सकारात्मक गोष्टींचा विचार करा. आज तुम्हाला काहीतरी नवीन करण्याची इच्छा असेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस शुभ असणार आहे. या दिवशी तुम्ही फॉर्म भरण्याशी संबंधित कामे करु शकता. संध्याकाळी कुटुंबासह खरेदीसाठी जाऊ शकता. मित्रांसोबत वाढदिवसाच्या पार्टीला जाण्याचाही योग आहे. आज तुम्ही धार्मिक कार्यक्रमात उत्साहाने सहभागी व्हाल.
वृश्चिक राशी
नवीन वर्षाचा पहिल्या दिवशी भाग्य तुम्हाला पूर्ण साथ देईल. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना मल्टीनॅशनल कंपनीकडून नवीन ऑफर मिळेल. विज्ञानाशी संबंधित लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. सरकारी नोकरीत असलेल्या लोकांना आज प्रमोशन मिळू शकते. घरात आनंदाचे वातावरण असेल. तुम्हाला कामकाजाच्या क्षेत्रात मान-सन्मान मिळेल.
धनु राशी
आज तुम्ही प्रियकरासोबत फिरायला जाण्याचा बेत आखाल. कौटुंबिक कलह आज मिटतील. नवीन वर्षाची सुरुवात गोड होईल. आज घरातून बाहेर पडण्यापूर्वी वडिलधाऱ्या व्यक्तींचा आशीर्वाद घेतला तर निश्चित लाभ मिळेल. आज तुमची एखादी अपूर्ण इच्छा पूर्ण होईल. व्यवसायानिमित्त बाहेर जाण्याचा योग आहे. आज आरोग्य पूर्वीपेक्षा चांगले राहील. आज तुम्ही वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घ्याल.
मकर राशी
कौटुंबिक मौजमस्तीसाठी तुम्ही दूर सहलीचे नियोजन करु शकता. यामुळे कुटुंबातील सर्व सदस्य आनंदी असतील. आज तुम्हाला एखाद्या मोठ्या पार्टीकडून ऑर्डर मिळू शकते. यामुळे आर्थिक बाजू सुधारेल. आज तुम्हाला धार्मिक गोष्टींत रस असेल आणि तुम्ही खूप धैर्यवान व्हाल. जेवणावर नियंत्रण ठेवा. त्यामुळे तुम्हाला त्रास संभावतो.
कुंभ राशी
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी घरातून बाहेर पडण्यापूर्वी वडिलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्यावा. त्यामुळे तुम्हाला निश्चित लाभ मिळेल. आज तुमचे महत्त्वाच्या कामात योगदान असेल. तुमच्या वैवाहिक जीवनात नवीन आनंद येईल. यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल.
मीन राशी
आज तुम्ही गरजू लोकांना मदत कराल, ज्यामुळे समाजात तुमची चांगली प्रतिमा सुधारेल. तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या भावनांचा आदर कराल, यामुळे नाते अधिक घट्ट होईल. कुटुंबात अनावश्यक वाद, भांडणे टाळा. कामाच्या ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तुम्हाला एखाद्या मोठ्या कंपनीकडून नोकरीची ऑफर मिळू शकते. महिलांनी आज स्वयंपाकघरात काम करताना काळजी घ्यावी.
(टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)