कोल्हापुरात हिट अॅंड रन! भरधाव कारने तरुणाला उडवले,आरोपी फरार,पहा व्हिडीओ

0
371

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून हिट अॅंड रनच्या घटनेता वाढ झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात एका भरधाव कारने तरुणाला उडवले. ही घटना समोरच लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. तरुणाला मागून धडक दिल्याचे व्हिडिओत दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना कोल्हापूर जिल्ह्यात घडली आहे. महामार्गावर भरधाव वेगात कार आली आणि तरुणाला उडवले. रोहित हाप्पे असं अपघातात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना नेमकी कुठे घडली ते अद्याप समोर आले नाही. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कोल्हापूर शहराजळ उचगावातील रहिवासी रोहित रात्री उशिरा घरी परतत असताना ही दुर्घटना घडली.

रोहित रस्त्यावरून जात असताना मागून भरधाव वेगात कार आली. कारने इतक्या जोरात धडक दिली की तो काही फुट अंतरावरावर उडाला. या धडकेमुळे रोहित गंभीर जखमी झाला. तो रक्तबंबाळ परिस्थिती पडून राहिला. कारचालक मदत करण्याऐवजी घटनास्थळावरून परार झाला.

या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. त्यामुळे पोलिस सीसीटीव्ही फुटेज पोलिस तपासत आहे. अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

पहा व्हिडीओ:

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here