
माणदेश एक्सप्रेस/पुणे : संभाजी ब्रिगेड आणि मराठा महासंघ केवळ ब्राह्मण द्वेषापोटी नवनवीन वाद उकरून काढतात. अडीचशे रुपयाचे जाकीट घालून नवनवीन इतिहास अभ्यासक येतात आणि शरद पवारांना फॉर अशी भुमिका मांडतात. माझी शरद पवारांना विनंती आहे, त्यांनी इतर इतिहास अभ्यासक पुढे करण्यापेक्षा स्वत:च इतिहास लिहावा, आणि त्यांना ज्या जातीची, समाजाची माती करायची आहे ती करावी, अशी टीका भाजपचे यांनी केली.
पुणे श्रमिक पत्रकार संघात बुधवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आ. पडळकर बोलत होते. रागयगडावरील वाघ्या श्वानाच्या वादावर बोलताना ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासामध्ये होळकर घराण्याचा मोठा वाटा आहे. त्यामुळे होळकरांच्या पुढाकाराने रायगडावर उभारलेल्या वाघ्या श्वानाच्या प्रति धनगर समाजाची आस्था आहे. संभाजी ब्रिगेड आणि मराठा महासंघाचे लोक ब्राह्मण समाजाला लक्ष करण्यासाठी जाणून बुजून वाद उकरून काढतात. जात पाहून इतिहास काढण्याची पद्धत २०१४ पासून सुरू झाली आहे.
शरद पवार यांना फॉर भुमीका अडीचशे रुपयाचे जाकीट घालणारे इतिहास अभ्यासक घेतात. शरद पवारांचा संपूर्ण पक्ष अजित पवारांकडे आला आहे. त्यामुळे शरद पवारांकडे मोकळा वेळ आहे. या वेळात शरद पवार यांनी स्वत: इतिहास लिहावा, आणि त्याना ज्या समाजाचे व जातीचे वाटोळे करायचे आहे ते करावे, त्यांनी इतर अभ्यासकांना कामाला लावू नये. वाघ्याचा पुतळा हटवा म्हणणारे संभाजी ब्रिगेड संभाजी महाराजांची हत्या करणाऱ्या औरंगजेबच्या कबरीवर काहीच बोलत नाही, असेही आ. पडळकर म्हणाले.