ताज्या बातम्यागुन्हेमहाराष्ट्रराजकारण

माजी महापौर आणि एमआयएमचे अध्यक्ष यांच्यावर गोळीबार

महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. मालेगावात रविवारच्या मध्यरात्री गोळीबारच्या घडना घडली आहे. ज्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. माजी महापौर आणि एमआयएमचे अध्यक्ष अब्दुल मलिक युनुस ईसा यांच्यावर गोळीबार झाला. तीन अज्ञातांनी गोळीबार केला अशी माहिती मिळाली आहे. गोळीबारच्या घटनेत अब्दुल मलिक गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अब्दुल मलिक हे रविवारी मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गा जवळील हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी बसले होते. मध्यरात्री १२च्या सुमारास दुचाकीहून तीन जण हॉटेलमध्ये आले आणि त्यांनी अब्दुल यांच्यावर गोळी झाडली. अंदाधुंद गोळीबारात अब्दुल गंभीर जखमी झाले. गोळीबारच्या घटनेनंतर आरोपी हल्लेखोर घटनास्थळवरून फरार झाले. त्यांच्यावर तीन वेळा गोळीबार केला. हाताला, पायाला आणि बरगडीत गोळी लागली. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गोळीबारची घटना पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी पोलिस दाखल झाले. अब्दुल मलिक यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. गोळीबारच्या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. गोळीबारच्या घटनेनंतर आमदार मौलाना मुफ्ती यांनी अब्दुल यांची रुग्णालयात भेट घेतली. आरोपीचा अद्याप शोध सुरु आहे, आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांनी पथक नेमले आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून घेतला आहे. आरोपींना लवकर अटक करा अशी विनंती आमदार मौलाना मुफ्ती यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button