ताज्या बातम्यामहाराष्ट्रशैक्षणिक

दहावीचा निकाल आज दुपारी 1ला होईल जाहीर !कसा पाहणार निकाल ;सविस्तर माहिती वाचा

१२ वीचा निकाल लागल्यावर १० वीचा निकाल कधी लागणार या बाबत प्रतीक्षा होती. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी देखील या बाबत काही दिवसांपूर्वी अपडेट दिली होती. त्यानुसार पालकांची आणि विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली असून आज सोमवारी दहावीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळ आज ११ वाजता पत्रकार परिषद घेऊन या बाबत माहिती देणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ आज दहावीचा निकाल करणार आहे. या निकालाबाबत पालकांना उत्सुकता लागून होती. दरम्यान, महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर दुपारी १ च्या दरम्यान, निकाल प्रसिद्ध केला जाणार आहे. यामुळे पालकांचीही धाकधूक वाढली आहे. अकरावीची पूर्व प्रवेश प्रक्रिया देखील दोन दिवसांपूर्वी सुरू झाली आहे.

यंदा दहावीची परीक्षा देणाऱ्यांची संख्या वाढली आहे. या वर्षी १६ लाख ९ हजार ५४४ विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी नाव नोंदणी केली होती. आज निकाल लागणार असल्याने सर्व विद्यार्थ्यांसह पालकांचीही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Maharashtra Weather update: राज्यात उष्णतेची लाट! यवतमाळ, अकोल्यात सर्वाधिक तापमान; मुंबईसह ‘या’ ठिकाणी पावसाची शक्यता
या संकेत स्थळावर होणार निकाल जाहीर
https://mahresult.nic.in

http://sscresult.mkcl.org

https://sscresult.mahahsscboard.in

https://results.digilocker.gov.in

असा पाहा निकाल
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या mahresult.nic.in या वेबसाईटला भेट द्या. होमपेजवरील दहावीच्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा. तुमच्या लॉगीन डिटेल्स, परीक्षा क्रमांक, आईचं नोंदवा. स्क्रीनवर तुमचा निकाल उपलब्ध होईपर्यंत थांबा. थोड्या वेळात तुमचं निकाल जाहीर होईल, निकाल मिळाल्यावर पीडीएफ फॉरमॅटमध्ये डाऊनलोड करा किंवा अथवा त्याची छापील प्रत काढून घ्या. विद्यार्थ्यांना निकाल लागल्यावर मूळ छापील प्रत ही काही दिवसांनतर त्यांच्या शाळांमध्ये दिली जाणार आहे.

ऑनलाईन निकालानंतर जर विद्यार्थ्याला स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकन करायचे असेल तर संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन (http://verification.mh-ssc.ac.in) स्वतः किंवा शाळांमार्फत अर्ज करता येईल.

ही परीक्षा पुणे, मुंबई, कोल्हापूर, नाशिक, अमरावती, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोकण आणि लातूर विभागांमार्फत घेण्यात आली होती. विभागीय मंडळाने पेपर तपासणी पूर्ण केली आहे.

निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावीची प्रवेश प्रक्रिया होणार सुरू
राज्यात अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी पहिल्या टप्प्यातील नोंदणीला २४ मे रोजी सुरुवात झाली आहे. आता दहावीचा निकाल आज जाहीर झाल्यावर या प्रक्रिेयेला वेग मिळणार आहे

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button