सांगली : उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पुरस्कार स्पर्धेत सहभागासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

0
83

माणदेश एक्सप्रेस न्युज : सांगली : महाराष्ट्र शासन, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडील शासन निर्णय दिनांक 31 जुलै 2024 अन्वये दिनांक 7 सप्टेंबर 2024 पासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवात राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्यासाठी स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहभागी होता यावे याकरीता अर्ज भरण्याची मुदत दि. 5 सप्टेंबर पर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हास्तरीय गणेशोत्सव पुरस्कार समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील यांनी दिली.

या स्पर्धेत धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलिसांकडे परवानगी घेतलेल्या किंया स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घेतलेल्या जास्तीतजास्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहभागी व्हावे यासाठी या स्पर्धेत भाग घेणास इच्छुक असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी या स्पर्धेचा अर्ज विहीत नमुन्या प्रपत्रामध्ये भरून तो अर्ज ऑनलाईन पध्दतीने पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com या ईमेल आयडीवर दि. 5 सप्टेंबर पर्यंत सादर करावा, असे आवाहन श्री. पाटील यांनी केले आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here