कोठडीत बुटाच्या लेसने घेतला फास , बलात्कार आणि खून करणाऱ्या आरोपीच्या संशयास्पद मृत्यूमुळे खळबळ !

0
22

 

राज्यातील चंद्रपुर जिल्ह्यातून हैराण करणारी घटना समोर आली आहे. जिथे प्रेयसीवर बलात्कार करून खून केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तरुणाने पोलीस कोठडीत आत्महत्या केली. मयत आरोपीने दोरी किंवा कपड्याने नसून बुटाच्या लेसने फासा बनवला होता, असे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे पोलीस खात्यावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

समाधान कोळी (20) याने रविवारी पोलीस कोठडीत असताना गळफास लावून आत्महत्या केली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. चंद्रपुरातील वरोरा पोलीस ठाण्याच्या शौचालयात रविवारी सकाळी 8.30 वाजता कोळी हा लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.

समाधान कोळीला 26 जून रोजी आनंदवनमध्ये त्याच्या मैत्रिणीवर बलात्कार करून खून केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती, असे अधिकाऱ्याने सांगितले. न्यायालयाने त्याला 4 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास समाधान कोळी याने शौचालयात जाऊन बुटाच्या लेसने गळफास लावून आत्महत्या केली. बराच वेळ तो टॉयलेटच्या बाहेर न आल्याने त्याचा शोध सुरू झाला. त्यानंतर ही घटना उघडकीस आली.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, कोठडीतील मृत्यू प्रकरणाची विभागीय चौकशी केली जात आहे. कर्तव्यात हलगर्जीपणा करणाऱ्या पोलिसांवर कारवाई केली जाईल. या प्रकरणाचा तपास सीआयडी करणार आहे.