“तुझे वडील तुला गॅस भरतात का? तु्झ्या बापाची रिक्षा आहे का?” रिक्षावाल्याची अरेरावी,थेट तरुणीच्या कानाखाली

0
444

बंगळुरूमधील ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बंगळुरुमध्ये भरदिवसा ऑटो चालकाने महिला प्रवाशाला मारहाण केली. या घटनेनंतर शहरातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये ऑटोचालक रागावून दोन महिलांसोबत वाद घालत असल्याचं दिसत आहे. रागाच्या भरात रिक्षाचालक अचानक एका महिलेला कानाखाली मारतो.

ओला रिक्षाचालकाकडून तरुणीला शिवीगाळ आणि मारहाण
एका ओला ऑटो चालकाने राइड रद्द केल्याने तरुणींना शिवीगाळ केली. ओला ऑटो राइड कॅन्सल केल्यानंतर ती तरुणी दुसऱ्या ऑटोमध्ये जाऊन बसली तेव्हा ड्रायव्हर तिथे गेला आणि समोर उभा राहिला. यानंतर तो रिक्षा ड्रायव्हरच्या सीटजवळ येऊन मुलींना धमकावू लागला. ऑटोचालकाने तरुणीसोबत गैरवर्तन करण्यास सुरुवात केल्यावर तरुणीने पोलिसात तक्रार करणार असल्याचं त्याला सांगितलं, पण रिक्षाचालकाची अरेरावी सुरुच होती.

महिला प्रवाशाचा कानशि‍लात लगावली
ओला ऑटो चालकाने रागात तरुणीला कानाखाली मारली. तरुणीने ऑटो चालकाला विचारलं, “तू का ओरडतोस?” यावर रिक्षाचालक म्हणाला, “तुझे वडील तुला गॅस भरतात का? तु्झ्या बापाची रिक्षा आहे का?” तरुणीने रिक्षाचालकाला विचारलं, तुम्ही मला का मारलं? मी तुमच्याशी आदराने बोलत आहे. असं असतानाही ऑटोचालकाने तरुणीच्या कानाखाली मारली. एवढेच नाही तर आजूबाजूच्या लोकांनीही ऑटोचालकाला साथ दिली.

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, मात्र बंगळुरूसारख्या मेट्रो शहरात महिलांच्या सुरक्षेबाबत काय पावले उचलली जात आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. फक्त एक राइड रद्द केल्याने ओला चालक इतका संतप्त झाला की त्याने तरुणीवर हात उचलला. दरम्यान, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या रिक्षाचालकाविरोधात कारवाई करण्यात आली आहे. राइड रद्द करण्यासाठी महिला प्रवाशाला शिवीगाळ आणि मारहाण करणाऱ्या ऑटो चालकाला बंगळुरू पोलिसांनी अटक केली आहे. मुथुराज असे ऑटो चालकाचे नाव असून मागडी पोलिसांनी त्याचा माग काढला आहे.

पहा व्हिडीओ:

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here