“लिंबाच्या झाडापासून गोड फळांची अपेक्षा करुच नका. जसा बाप..” पडळकरांचा शरद पवारांसह सुप्रिया सुळेंवर जोरदार निशाणा

0
538

शरद पवार हे जातीयवादाचं विद्यापीठ आहे. सुप्रिया सुळे या लहानपणीपासून त्यांच्याकडूनच हे सगळं शिकल्या असल्याची जहरी टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलीय. लिंबाच्या झाडापासून गोड फळांची अपेक्षा करुच नका. जसा बाप तशीच लेक असं म्हणत पडळकरांनी शरद पवारांसह सुप्रिया सुळेंवर जोरदार निशाणा साधला.

सुप्रिया सुळे त्यांच्यातली ‘किडकी बहिण’ महाराष्ट्राला दाखवतायेत, पळकरांची टीका
सुप्रिया सुळे या अजित पवार यांच्याबद्दल सहानुभूती दाखवू नका असं बोलतात. अजित पवार तिकडं लाडकी बहिण योजनेसाठी राज्यभरात फिरत आहेत. पण इथं सुप्रिया सुळे त्यांच्यातली ‘किडकी बहिण’ महाराष्ट्राला दाखवत असल्याचे गोपीचंद पडळकर म्हणाले. मनोज जरांगे पाटील, एकनाथ शिंदे आणि शरद पवार हे तिघही मराठा आहेत, म्हणून जरांगे शिंदेंबद्दल बोलायच नाही असं सुप्रिया सुळे बोलल्या असल्याचे पडळकर म्हणाले. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आता यात वेळीच हस्तक्षेप करायला पाहिजे. कारण, मुख्यमंत्र्यांचे नाव घेऊन इथं महायुतीत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे पडळकर म्हणाले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here