
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आल्याचं बोललं जात आहे. विशेष म्हणजे मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघाचा तिढा लवकरच सोडवण्यात येणार आहे. तसेच मुंबईतील शिवसेना ठाकरे गट 20, काँग्रेस 18, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 7 जागांवर आग्रही असल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेस उच्चभ्रू मतदारसंघ असलेल्या मलबार हिलसाठी देखील आग्रही आहे.
मुंबईतील 18 जागांवर काँग्रेस आग्रही-
1) धारावी
2) चांदिवली
3) मुंबादेवी
4) मालाड पश्चिम
5) सायन कोळीवाडा
6) कुलाबा
7) कांदिवली पूर्व
8) अंधेरी पश्चिम
9) वर्सोवा
10) वांद्रे पश्चिम
11) घाटकोपर पश्चिम
12) कुर्ला
13) भायखळा
14) जोगेश्वरी पूर्व
15) मलबार हील
16) माहीम
17) बोरीवली
18) चारकोप


