ऑटोमोबाईलताज्या बातम्या

आजपासून ड्रायव्हिंग लायसन्सशी संबंधित बदलेले नियम पहा’ अन्यथा बसेल 25,000 रुपयांचा दंड

नवीन नियम लागू झाल्यानंतर आरटीओमध्ये लांबच लांब रांगांपासून मुक्ती मिळणार आहे.

माणदेश एक्सप्रेस न्युज । १ जून २०२४ । आज पासून म्हणजेच १ जूनपासून अनेक नवीन नियम लागू झाले आहेत तसेच अनेक जुने नियम बदलले आहेत. दरम्यान आजपासून वाहतूकसह ड्रायव्हिंग लायसन्सशी संबंधित नियमांमध्ये बदल केले आहेत. ड्रायव्हिंग लायसन्सचा नवीन नियमामध्ये जर तुम्ही चूक केली तर, तुम्हाला 25,000 रुपयांपर्यंतच्या दंडाचे चलन कापले जाऊ शकते.

१ जूनपासून ड्रायव्हिंग लायसन्सचे नियम बदलले
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) 1 जूनपासून ड्रायव्हिंग लायसन्सचे नियम सोपे केले आहेत. परवाना प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे. नवीन नियमांनुसार कोणतीही व्यक्ती खासगी प्रशिक्षण केंद्रात जाऊन त्याची ड्रायव्हिंग चाचणी देऊ शकते. पूर्वी ड्रायव्हिंग टेस्ट फक्त आरटीओमध्येच घेतल्या जात होत्या, पण आता तुम्ही कोणत्याही मान्यताप्राप्त ड्रायव्हिंग स्कूलमध्ये जाऊन तिथे ड्रायव्हिंग टेस्ट देऊ शकता. त्यासाठी सरकार त्या केंद्रांना प्रमाणपत्र देणार आहे. नवीन नियम लागू झाल्यानंतर आरटीओमध्ये लांबच लांब रांगांपासून मुक्ती मिळणार आहे. ड्रायव्हिंग चाचणीनंतर, केंद्र तुम्हाला प्रमाणपत्र देईल, ज्याचा वापर करून तुम्ही RTO मध्ये परवान्यासाठी अर्ज करू शकाल.

फी मध्ये देखील सुधारणा
केंद्र सरकारने 1 जूनपासून ड्रायव्हिंग लायसन्सचे अर्ज आणि नूतनीकरणाशी संबंधित शुल्कातही सुधारणा केली आहे. नवीन नियमानुसार, कायमस्वरूपी ड्रायव्हिंग लायसन्स किंवा लर्निंग लायसन्स मिळवण्यासाठी किंवा त्याचे नूतनीकरण करण्यासाठी 200 रुपये शुल्क भरावे लागणार आहे.

अन्यथा 25,000 रुपये दंड आकारला जाईल
अतिवेगाने वाहन चालवणाऱ्यांनी आता सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. विहित मर्यादेपेक्षा वेगाने गाडी चालवताना पकडले गेल्यास 1000 ते 2000 रुपये दंड आकारला जाईल. त्याचबरोबर अल्पवयीन व्यक्ती गाडी चालवताना पकडली गेल्यास त्याला 25 हजार रुपयांच्या दंडाला सामोरे जावे लागणार आहे. एवढेच नाही तर त्याच्या परवान्याचे 25 वर्षांपर्यंत नूतनीकरण केले जाणार नाही. अल्पवयीन मुलाचे पालक आणि वाहनधारकांवरही कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. वाहनाची नोंदणी देखील रद्द केली जाऊ शकते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button