आटपाडी शहरातून बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल

0
1483

माणदेश एक्सप्रेस न्युज/ आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी शहरातून बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या चालका विरुद्ध आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, साठे चौक ते आबा नगर चौक, मार्केटयार्ड रोडवर चारचाकी टाटा कंपनिचा छोटा हत्ती हयगयिने व बेदरकारपणे रस्त्यावर इतर वाहनांना अडथळा होईल अशा पदधतिने चालविताना व इतरांचे जिवितास धोका होईल अशा पद्धतीने रस्त्यावर चालवित असताना, पोलिसांना समजले.

यावेळी पोलिसांनी आरोपी पारस सावलाराम राठोड (वय 45) रा. भंडारे कॉलनी, आबानगर चौक, ता.आटपाडी याला ताब्यात घेतले. त्याच्या विरुद्ध आटपाडी पोलिसात गुन्हा नोंद झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.