आटपाडी : उंबरगावमध्ये एकाची गळफास घेत आत्महत्या

0
1868

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील उंबरगाव येथे एकाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना काल दिनांक २४ रोजी सकाळी ११.३० वाजणेच्या सुमारास घडली. याबाबत आटपाडी पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, लक्ष्मण कुंडलिक शिनगारे (वय ३८) हे उंबरगाव येथील पिंपळमळा येथे राहण्यास आहेत. आज दिनांक २४ रोजी सकाळी ११.३० वाजणेच्या सुमारास त्यांचे मामा नंदकुमार मारुती कुदळे यांचे फॉर्म हाऊस येथे पत्र्याचे लोखंडाचे अँगल ला दोराच्या सहाय्याने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली.

सदर घटनेबाबत उंबरगावचे पोलीस पाटील राजेंद्र ज्ञानू शिनगारे यांनी आटपाडी पोलिसात फिर्याद दिली असून, सदर घटने बाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.