‘…पण वारंवार उपमुख्यमंत्रीपदावर अडकतो’;अजित पवारांचं मोठं वक्तव्य

0
360

 

अनेकदा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्याचा मुख्यमंत्री होण्याबाबतच आपली इच्छा अनेकदा बोलून दाखवली आहे. अशातच अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुन्हा एकदा एका कार्यक्रमामध्ये बोलताना त्यांनी मुख्यमंत्री पदाबाबतची इच्छा बोलून दाखवत असताना मोठं वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा उघडपणे बोलून दाखवली. एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी सांगितले की, मला मुख्यमंत्री व्हायचे आहे, पण वारंवार उपमुख्यमंत्रीपदावर अडकतो. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यातील जागावाटपावरही भाष्य केलं आहे.

इंडिया टुडेच्या एका कार्यक्रमात अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, ‘मला मुख्यमंत्री व्हायचे आहे, पण मी पुढेच जात नाही. मला संधी मिळत नाहीये. 2004 मध्ये राष्ट्रवादीला मुख्यमंत्री करण्याची संधी होती, पण पक्षाने ती गमावली, असेही ते म्हणाले. विशेष म्हणजे 2004 मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद काँग्रेसच्या खात्यात आले.

2004 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला. त्यावेळी पक्षाला 71 जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेस 69 जागांवर विजय मिळवत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर काँग्रेस नेते विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले. देशमुख यांचे2012 मध्ये निधन झाले.

जागावाटपाचा फॉर्म्युला अजित पवार यांनी केला स्पष्ट
2019 मध्ये पक्षाने जिंकलेल्या जागांच्या आधारे जागावाटप केले जाईल, असे अजित यांनी कार्यक्रमात बोलताना सांगितले. ते म्हणाले, ‘भाजप 2019 मध्ये जिंकलेल्या जागांवर निवडणूक लढवेल. राष्ट्रवादी आणि शिवसेनेचेही तेच होईल. अशा स्थितीत 200 जागांवर जागावाटपाचा फॉर्म्युला स्पष्ट झाला आहे. उर्वरित 88 जागांवर महायुतीत चर्चा केली जाईल.

2019 महाराष्ट्र विधानसभा निवडणूक
2019 मध्ये अविभाजित राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेससोबत आघाडी करून निवडणूक लढवली होती. त्याच वेळी भाजप आणि नंतर अविभक्त शिवसेना एकत्र होते. 2019 मध्ये भाजपने 164 जागा लढवल्या आणि 105 जागा जिंकल्या. तर शिवसेनेने 126 पैकी 56 जागा जिंकल्या. त्यानंतर राष्ट्रवादी 54 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला तर काँग्रेसला 44 जागा मिळाल्या.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here