
माणदेश एक्सप्रेस न्युज|मुंबई : ‘बिग बॉस १९’ची (Bigg Boss 19) घोषणा झाली आहे. याहीवेळी सलमान खानच सीझन होस्ट करणार आहे. यंदा सीझनमध्ये कोणते सेलिब्रिटी सहभागी होणार याची चर्चा सुरु झाली आहे. काही सेलिब्रिटींना मेकर्सने अप्रोचही केलं आहे. तसंच यावेळी कोणत्याही इन्फ्लुएन्सर्सना घेणार नसल्याचं मेकर्सने स्पष्ट केलं आहे. दरम्यान ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधील ‘या’ गाजलेल्या कलाकाराला मेकर्सने ‘बिग बॉस १९’ मध्ये सहभागी होण्याची ऑफर दिली आहे.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतले सगळेच कलाकार लोकप्रिय आहेत. त्यातच बबिता या भूमिकेतून मुनमुन दत्ताला (Munmun Dutta) कायमची बबिता नावानेच ओळख मिळाली. मुनमुन दत्ताला यावेळी बिग बॉससाठी अप्रोच करण्यात आलं आहे. अद्याप बबिताकडून याबाबत अधिकृत माहिती आलेली नाही. मेकर्स तिच्यासोबत चर्चा करत आहेत. विशेष म्हणजे याआधीही मुनमुनला बिग बॉसच्या ऑफर मिळाल्या आहेत. मात्र मालिकेतील कमिटमेंट्समुळे ती कधी या शोचा भाग होऊ शकली नाही. आता यंदा तरी ती या शोचा भाग होईल की नाही हे लवकरच स्पष्ट होईल.
यंदा ‘बिग बॉस १९’ मध्ये राम कपूर आणि गौतमी कपूर ही रिअल लाईफ जोडीही दिसण्याची शक्यता आहे. सलमान खान जून महिन्याच्या शेवटी बिग बॉस १९ चा प्रोमो शूट करेल अशी चर्चा आहे.