मोठी बातमी! पहा वंदे भारत स्लीपरचा जबरदस्त लूक, प्रवाशांनाही या ट्रेनची भुरळ

0
325

देशातील सर्वात हायस्पीड वंदे भारत ट्रेनने नुतकेच शतक पूर्ण केले असून प्रवाशांनाही या ट्रेनची भुरळ पडली आहे. देशातील लांब पल्ल्याच्या विविध मार्गांवर ही ट्रेन सुरू झाल्यानंतर प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद या ट्रेनला मिळत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी आज (31 ऑगस्ट) रोजी 3 नवीन वंदे भारत ट्रेनना हिरवा झेंडा दाखवला. या तीन ट्रेन चेन्नई ते नागरकोइल, मदुराई ते बेंगळुरू आणि मेरठ ते लखनौ दरम्यान धावतील.

देशभरात आता 102 वंदे भारत ट्रेन धावत असून या गाड्यांमधून 3 कोटींहून अधिक लोकांनी प्रवास केला आहे. वंदे भारत ट्रेन ही पहिल्यांदा 15 फेब्रुवारी 2019 रोजी मेक इन इंडिया योजनेअंतर्गत सुरू करण्यात आल्या.सध्या देशात 100 हून अधिक वंदे भारत धावत आहेत. वंदे भारत ट्रेनचे मार्ग देशातील 280 हून अधिक जिल्ह्यांना जोडत आहेत.आता, आनंदाची बाब म्हणजे वंदे भारत ट्रेनची स्लीपर आता लवकरच रेल्वे मार्गावर धावणार आहे. स्लीपर वंदे भारत ट्रेनचा फर्स्ट लूक नुकताच समोर आला असून कर्नाटकच्या बंगळुरू येथे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्लीपर वंदे भारत ट्रेनची पाहणी केली.

भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड (BEML) सुविधेमध्ये वंदे भारत स्लीपर कोचच्या प्रोटोटाइपचे अनावरण रेल्वेमंत्र्यांच्याहस्ते करण्यात आले.वंदे भारत स्लीपर प्रशिक्षकांच्या संरचनेचे अनावरण केल्यानंतर, वैष्णव यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले की, पुढील मूल्यमापनासाठी हे स्लीपर कोच ट्रॅकवर ठेवण्यापूर्वी पुढील 10 दिवसांत या ट्रेनच्या सर्वोतोपरी चाचण्या घेण्यात येतील.विशेष म्हणजे पुढील तीन महिन्यांत ही ट्रेन प्रवाशांच्या सेवेत रेल्वे रुळावर धावण्याची शक्यता आहे. कारण, रेल्वेमंत्र्यांनी स्वत: याबाबत माहिती दिली. आम्ही पुढील तीन महिन्यांत वंदे भारत स्लीपर कोच रेल्वे रुळावर धावेल यासाठी प्रयत्नशील असून प्रवाशांच्या सेवेत पोहोचेल, अशी अपेक्षा असल्याचे अश्विनी वैष्णव यांनी म्हटले.

दरम्यान, भगव्या रंगात ही पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन पाहायला मिळाली असून लक्झरीयस लूक आणि आरामदायी व्यवस्था या ट्रेनमध्ये असल्याचे दिसते.स्लीपर ट्रेनमध्ये बर्थ सीट व्यवस्थाही अफलातून असून प्रवाशांना सर्वोतोपरी आरामदायी सुविधा देण्यात येणार असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे ट्रेनमधील टायलेटची सुविधाही उत्कृष्ट अन पाश्चिमात्य कमोड पद्धतीची आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here