आटपाडी : विठलापूर येथे दुचाकीची दुचाकीला धडक : एक जखमी

0
8

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील विठलापूर येथे दुचाकी गाडीला दुचाकी गाडीने धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये एक जन जखमी झाल्याची घटना आज दिनांक २८ रोजी घडली असून याप्रकरणी आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

त्याबाबत अधिक माहिती अशी, यातील फिर्यादी हनुमंत कृष्णा माने (वय 62) रा. यपावाडी, ता.आटपाडी, जि. सांगली हे विठलापूर येथील समर्थ हॉस्पिटल पासून थोड्या अंतरावर स्वतःच्या गाडीवरून आले असता अचानक समोरून एक मोटर सायकल स्वार आडवे येऊन फिर्यादीची मोटार सायकल एमएच १० बी एस 84 70 हिला समोरील धडक दिली.

यामध्ये फिर्यादी हनमंत माने व संध्याराणी हनमंत माने गंभीर जखमी झाले. हनमंत माने यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात मोटार सायकल चालका विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here