आटपाडी : विठलापूर येथे सुनेकडून सासऱ्याला मारहाण

0
1427

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी : सुनेच्या हातातील मोबाईल घेण्याच्या प्रयत्न करणाऱ्या सासऱ्याला चक्क सुनेचा मार खावा लागला. यामध्ये सुनेने सासऱ्याला चपाती करायच्या लाटण्याने डोळ्याजवळ, मनगटावर, ओठावर मारून करून जखमी केल्याचा प्रकार आटपाडी तालुक्यातील विठलापूर येथे घडला.

याबाबत सासरे नामदेव अण्णा कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सून वैष्णवी नितीन कोळी हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरूवारी सायंकाळी विठलापूर येथे घरी घडली. नामदेव कोळी हे घरी असताना मुलगा नितीन याने त्यांना दिलेला मोबाईल सून वैष्णवी हिने घेतला. त्यावेळी मोबाईल मला परत दे, तो मुलाला देईन, असे सांगत नामदेव यांनी सुनेकडे मागणी केली. परंतु सुनेने मोबाईल सासऱ्यांना दिला नाही.

सुन किचनमध्ये असताना सासरे नामदेव यांनी तिच्या हातातून मोबाईल घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सून वैष्णवीने लाटणे घेऊन सासऱ्याच्या डोळ्यावर, मनगटावर मारल्याचे नामदेव कोळी यांनी फिर्यादीत म्हटले आहे. सासऱ्याच्या तक्रारीनंतर पोलीसात सुनेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.