सांगली जिल्हा बँक गैरव्यवहारातील दोषींवर कारवाई होणार : “या” मंत्र्यांनी दिले, आमदार गोपीचंद पडळकरांना उत्तर

0
672

माणदेश एक्सप्रेस न्युज : मुंबई : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक कामकाजाबाबत प्राप्त तक्रारींच्या अनुषगाने विभागीय सहनिबंधकांनी केलेल्या चौकशीनुसार दोषींवर कारवाई करण्यात आली आहे. जबाबदारी निश्चितीसाठी प्राधिकृत अधिकाऱ्यांमार्फत चौकशी सुरु असल्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानपरिषदेत माहिती दिली.

सांगली जिल्हा बँकेमध्ये गैरव्यवहार प्रकरणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर मंत्री वळसे-पाटील यांनी दिले. विभागीय सहनिबंधकांनी केलेल्या चौकशीनुसार बँकेने सन २०१२-२०१३ व २०१९-२०२० कालावधीत तीन कंपन्यांना मंजूर ने केलेल्या कर्जप्रकरणात अनियमितता आढळली आहे.

बँकेने सन २०१९ मध्ये केलेल्या तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या नोकरभरतीत दोघांनी अनुभवाचे बोगस दाखले सादर केल्याचे आढळले. त्यानुषंगाने कारवाई केली जात आहे. चौकशीसाठी सहकार आयुक्तांनी नेमलेल्या विभागीय सहनिबंधक डी. टी. छत्रीकर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीने अहवाल दिला. यानुसार विभागीय सहनिबंधकांनी कलम ८३ अन्वये सहकार उपनिबंधक कराड यांनी अहवाल सादर केला. त्यात तांत्रिक पदांच्या नोकरभरतीच्या अनुषंगाने बँकेस कारवाईचे आदेश दिले आहेत.