आटपाडी : दिघंचीत ट्रक्टरच्या धडकेत वृद्धा जागीच ठार

0
1797

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील दिघंची यथील नळमळा येथे ट्रक्टरच्या धडकेत वृद्धा ठार झाल्याची घटना काल दिनांक २१ रोजी सकाळी ६.०० च्या सुमारास घडली. सदर घटनेची फिर्याद नितीन यशवंत मोरे यांनी आटपाडी पोलिसात दिली आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी, फिर्यादी नितीन मोरे यांच्या आजी पार्वती दत्तू जाधव (वय 80) सध्या रा. नळ मळा दिघंची, मुळगाव रा. नंदेश्वर भोसे ता. मंगळवेढा, जि. सोलापूर या नळ मळा ते रानमळा जाणारा डांबरी रोड कडेला थांबल्या होत्या. यावेळी आरोपी समाधान दादासो पवार रा. नळ मळा दिघंची हा ट्रॅक्टर भरधाव वेगाने घेवून निघाला होता. यावेळी ट्रक्टरने पार्वती जाधव यांना धडक दिली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.

 

सदर घटनेबाबत ट्रक्टर चालक आरोपी समाधान पवार याच्यावर आटपाडी पोलिसात गुन्हा नोंद झाला असून, सदर घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.