
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी (प्रतिनिधी) : आटपाडी तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींसाठी आज आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पार पडला. यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय व महिला अशा विविध गटांसाठी पदे आरक्षित करण्यात आली आहेत. आरक्षणानुसार सरपंच व सदस्य पदांसाठी उमेदवार निश्चित होतील. यामुळे आगामी निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून, अनेक गावांमध्ये स्थानिक राजकीय घडामोडींना गती मिळाली आहे.
अनुसूचित जाती सर्वसाधारण मानेवाडी, बाळेवाडी, पारेकरवाडी तर अनुसूचित जाती स्त्री लेंगरेवाडी, देशमुखवाडी, चिंचाळे याठिकाणी आरक्षण निघाले आहे. नागरिकांचा मागास प्रवर्ग मध्ये खानजोडवाडी, कुरुंदवाडी, मुळेवाडी, बोंबेवाडी, पिंपरी बुद्रुक उंबरगाव, बनपुरी तर नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री कानकात्रेवाडी, वाक्षेवाडी, यपावाडी, तडवळे तळेवाडी, पुजारवाडी (दि), हिवतड या ठिकाणी आरक्षण निघाले आहे.
सर्वसाधारण मध्ये पडळकरवाडी, मिटकी, पात्रेवाडी, आंबेवाडी, कामथ, काळेवाडी, पुजारवाडी (आ), घाणंद वलवण, माडगुळे, लिंगीवरे, कौठूळी, गोमेवाडी, नेलकरंजी, शेटफळे, करगणी, दिघंची तर सर्वसाधारण स्त्री आवटेवाडी, धावडवाडी, माळेवाडी, मासाळवाडी, पळसखेल, पिंपरी खुर्द, जांभुळणी, गळवेवाडी, विभूतवाडी, आवळाई, राजेवाडी, विठ्लापूर, झरे, निंबवडे, खरसुंडी, घरनिकी या ठिकाणी आरक्षण निघाले आहे.
आटपाडी पंचायत येथील श्रीमंत बाबासाहेब देशमुख सभागृहात आज आरक्षण सोडत आटपाडीचे तहसीलदार सागर ढवळे यांच्या उपस्थित संपन्न झाले. आरक्षणाच्या घोषणेनंतर गावागावात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अनेक इच्छुकांनी आपली तयारी सुरू केली आहे. आगामी निवडणुकीसाठी उमेदवार निवड, गटबाजी, वाद-विवाद आदी घडामोडींना आता चालना मिळणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
.