महिलांना बंदुक बाळगण्याची परवानगी द्या, बंदुका मी घेऊन देईन, असे वक्तव्य शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याने केल्याने एकच खळबळ उडाली. अमरावती येथे आज हिंदुत्ववादी संघटनांनी विराट हिंदू मोर्चाचे आयोजन केले होते. शिंदे गटाचे पदाधिकारी नानकराम नेभनानी यांनी हे वक्तव्य केले आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. अशावेळी अमरावतीत केलेले वक्तव्य चर्चेत आले आहे. अशा प्रकरणात कोर्ट कचेरीचे कामकाज करावे लागले. त्यासाठी खर्च करावा लागला तरी तो आपण करु असे वक्तव्य नेभनानी यांनी केले.
बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारा संदर्भात आज अमरावतीत सकल हिंदू समाजाच्या वतीने विराट हिंदू मोर्चा आयोजीत करण्यात आला होता. शहरातील नेहरू मैदान ते इर्विन चौकापर्यंत मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मोर्चा नेहरू मैदान ते इर्विन चौक या मार्गाने आयोजीत करण्यात आला. विविध हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चात सहभाग होता. या कार्यक्रमात माजी खासदार नवनीत राणा, राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे आणि इतर नेते उपस्थित होते.
नानकराम नेभणानी म्हणाले सर्वांना रिव्हाल्वर देतो, सर्वांचे मला माहित नाही पण पहिल्यांदा मला द्या, अशी मागणी खासदार अनिल बोंडे यांनी केली. सर्वांना लढता आलं पाहिजे यासाठी मोदीजींनी अग्निविर सारख्या योजना आणल्या.. पण विरोधक त्याला विरोध करतात. कारण काँग्रेसला भारताचा बांगलादेश करायचा आहे. हिंदूंवर अत्याचार करायचा आहे असा आरोप त्यांनी काँग्रेसवर केला.