बनाना मफिन्स कधी खाल्लीत का?नक्की ट्राय करा

0
230

घरच्या-घरी अगदी सोप्या पद्धतीने केळ्यापासून मफिन्स बनवा,लहान मुले आवडीने खातील…

घटक
35 मिनिटे
12 सर्व्हिंग्ज
पिकलेली केळी-३ मध्यम आकाराची
1 कप कणिक / मैदा
1/2 कप साखर
1/4 कप तूप
3/4 चमचा बेकिंग पावडर
1/2 चमचा बेकिंग सोडा
1/4 चमचा दालचिनी पूड
चिमूटभर मीठ
1 टीस्पून दूध (गरज पडल्यास)
काजू, बेदाणे आवडीनुसार

कुकिंग सूचना
1
एका बाउल मध्ये केळी सोलून मॅश करून घ्या.
त्यात साखर आणि तूप घालून चांगलं एकत्र करून घ्या.
2
दुसऱ्या बाउल मध्ये कणिक, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, मीठ आणि दालचिनी पूड एकत्र करून घ्या.
कणकेच्या बाउल मध्ये केळ्याचे मिश्रण घाला आणि एकत्र करा. जास्त फेटू नका.
3
मिश्रण फार घट्ट असेल तर थोडे दूध घालून मिक्स करा.
4
ओव्हन १८० डिग्री वर गरम करून घ्या.
5
मफिन साच्याना तूप लावून त्यात मोठ्या चमच्याने मिश्रण घाला. अर्धा साचा भरेल एवढं मिश्रण घाला. वरून काजू, बेदाणे घाला
6
ओव्हन मध्ये १८० डिग्री वर ३०-३५ मिनिटं बेक करा.
7
गरमागरम बनाना मफिन्स चहा बरोबर सर्व्ह करा.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here