‘अजित पवारांबरोबरची युती म्हणजे दुर्दैवी, असंगाशी संग’; ‘या’ भाजप नेत्याच वादग्रस्त वक्तव्य

0
248

महाविकास आघाडीने आम्हीच निवडणूक जिंकणार असा आत्मविश्वास व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे महायुतीनेही   कंबर कसली आहे. अशात महायुतीत ऑल इज नॉट वेल अशी स्थिती आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे. शिवसेना नेत्याने अजित पवारांबाबत एक वक्तव्य केलं होतं. त्यांच्याबरोबर बसलं तरी उलटी येते असं म्हटलं होतं. हे प्रकरण मिटत नाही तोच आता भाजपा नेत्याने अजित पवार आणि त्यांच्या पक्षाबाबत आक्षेप घेतला आहे.

लोकसभा निवडणुकीत अहमदपूरचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार बाबासाहेब पाटील आणि त्यांचे कार्यकर्ते बाहेर पडलेच नाहीत. यामुळे भाजपाच्या खासदाराचा पराभव झाल्याचं गणेश हाके म्हणाले. त्यामुळं अजित पवार गटाबरोबर झालेली युती दुर्दैवी आहे. खरं म्हणजे ती युती ना त्यांना पटली ना आम्हाला पटली. असंगशी संग म्हणतात असा संग घडला आहे असं हाके म्हणाले. दरम्यान, हाके यांच्या वक्तव्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते काय भूमिका घेणार हे पाहणं देखीवल महत्वाचं ठरणार आहे. कारण मागील दोन दिवसापूर्वीच शिवसेना शिंदे गटाचे नेते आमि राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसवर जहरी टीका केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले होते. आता महायुतीत काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असेल

महायुतीचा धर्म आम्हीच पाळायचा का? गणेश हाकेंचा सवाल
अजित पवार गटाचे बाबासाहेब पाटील हे अहमदपूर मतदारसंघाचे आमदार आहेत. ते म्हणतात आपली युती आहे. आपली युती होती तर तुम्ही लोकसभेमध्ये युतीचा धर्म पाळला का? आमच्या खासदारासाठी तुम्ही काम केलं का? असे म्हणत तुम्ही आमच्या खासदारांना पाडण्याचं काम केल्याचा आरोप यावेळी भाजपचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांनी केला. पैसे आमचे घेऊन काँग्रेसच्या पेंडलमध्ये तुमचे कार्यकर्ते नेते नगरसेवक बसत होते. महायुतीचा  धर्म एकट्याने आम्हीच पाळायचा का?असा सवाल हाके यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here