तिन्ही खानचे चित्रपट लवकरच येतायत धमाका करायला; बॉक्स ऑफिसवर पाडणार पैशांचा पाऊस!

0
3

सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खान बॉक्स ऑफिसवर नेहमीच राज्य करत असतात. येत्या काही दिवसांत त्यांचे आगामी चित्रपट पुन्हा बॉक्स ऑफिस गाजवणार आहेत

1. आमिर खानचा कॉमेडी अंदाज
आमिर खान सध्या ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. येत्या नाताळात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल. पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार, आमिरला आता कायदा आणि विनोद असणारा चित्रपट करायचा आहे. त्यामुळे सध्या दोन संहितेवर त्याचं काम सुरू आहे. राजकुमार संतोषी दिग्दर्शित चित्रपट तो करणार आहे. तसेच जोया अख्तरच्या एका चित्रपटावरही त्याचा विचार सुरू आहे. ‘सितारे जमीन पर’च्या शूटिंगनंतर आमिर या चित्रपटाचं शूटिंग सुरू करणार आहे.

2. सलमान खानचं ‘बॅड बॉय’ रूप
सलमान खान 18 जून 2024 पासून ‘सिकंदर’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. या चित्रपटात कमाल अॅक्शन सीक्वेंस असणार आहेत. या चित्रपटासाठी भाईजानने विशेष ट्रेनिंग घेतलं आहे. पहिला अॅक्शन शॉट 33,000 फीट उंचीवर चित्रीत करण्यात येणार आहे. एआर मुरुगादास ‘सिकंदर’च्या पात्रासाठी सलमान खानचा विचार करत आहेत. सिकंदर हा एका किंगचा मुलगा आहे. चित्रपटात सलमान प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. सिंकदरमधील सलमान खानचं पात्र भावनांनी भरलेलं असणार आहे.सलमानचा ‘सिकंदर’ हा चित्रपट 2025 च्या ईदच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे. तर आमिर खान आणि शाहरुख खानच्या चित्रपटांची अंतिम रिलीज डेट अद्याप समोर आलेली नाही.

 

3. शाहरुख खानचं अॅक्शन थ्रिल
शाहरुख खानच्या ‘किंग’ या चित्रपटाची घोषणा झाली आहे. सुजॉय घोष या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत. या चित्रपटात शाहरुखसह सुहाना खान मुख्य भूमिकेत झळकणार आहे. ‘किंग’ चित्रपटात शाहरुख मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘किंग’ हा अॅक्शन, थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटाच्या प्री-प्रोडक्शनसोबत शाहरुख खान जोडला गेला आहे. चित्रपटाच्या अॅक्शन सीनसाठी ‘पठाण’चे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांचा सल्ला घेतला जात आहे. या वर्षात ऑगस्ट महिन्याच्या शेवटी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here