रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या मुलीला कारची जोरदार धडक

0
7

पुण्यामध्ये परत एकदा हिट एंड रन चे प्रकरण समोर आले आहे. महाराष्ट्रातील पुण्यामध्ये पिंपरी चिंचवड शहरातून परत एकदा हिट एंड रन चे प्रकरण समोर आले आहे, ज्यामध्ये जलद गतीने जाणाऱ्या कार ने रस्त्याच्या बाजूला उभी असलेल्या मुलीला जोरदार धडक दिली आहे. ही टक्कर एवढी भीषण होती की यामध्ये ती मुलगी वीस फूट वरती हवेत उडाली आणि पुढे जाऊन कोसळली.

मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात सांयकाळी हिंजवडी परिसरातील भुजबळ चौकाजवळ रस्त्यावर झाला. जिथे एका बेजवाबदार चालकाने आपल्या गाडीने उभ्या असलेल्या मुलीला जोरदार धडक दिली. गाडीची गती जलद असल्याने ही मुलगी धडक लागताच वीस फूट हवेमध्ये उडाली. या प्रकरणात पोलिसांनी माहिती दिली आहे की, या हिट एंड रन प्रकरणात कार ड्राइवर नशे मध्ये न्हवता.

हिंजवडी पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणामध्ये कार चालकाविरुद्ध अजून कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही. या अपघातात गंभीर जखमी झालेली मुलगी मुंबईची राहणारी आहे. जिने आजून पर्यंत तक्रार दाखल केली नाही. पोलिसांनी सांगितले की पीडित मुलीने तक्रार दिल्यानंतर आम्ही कार चालकावर कारवाई करू शकू.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here