ताज्या बातम्याआरोग्य

भारतात बर्ड फ्लू चा दुसरा रुग्ण;पश्चिम बंगाल मध्ये 4 वर्षीय चिमुकलीला लागण

पश्चिम बंगाल मध्ये 4 वर्षाच्या मुलीला H9N2 virus ची लागण होऊन बर्ड फ्लू झाल्याची माहिती World Health Organization कडून देण्यात आली आहे. दरम्यान ही मुलगी श्वसनाला त्रास, ताप, पोटात क्रॅम्स येण्याच्या तक्रारीवरून Pediatric Intensive Care Unit मध्ये दाखल होती. फेब्रुवारी महिन्यापासून तिच्यावर उपचार सुरू होते. 3 महिन्यांच्या उपचारानंतर तिची हॉस्पिटलमधून सुटका झाली आहे.

घरामध्येच या चिमुकलीने मांसाहार केला होता. मात्र तिच्या कुटुंबामध्ये कोणालाही हा त्रास जाणवला नाही. दरम्यान WHO कडून लसीकरण, अॅधन्टी व्हायरल ट्रीटमेंट बाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. भारतामध्ये माणसांत H9N2 bird flu चं निदान होण्याची ही दुसरी घटना आहे. पहिला रूग्ण 2019 मध्ये समोर आला होता.

H9N2 वायरसमुळे सामान्यत: सौम्य स्वरूपाचा आजार बळावतो असे युनायटेड नेशन्स एजन्सीने असे म्हटले आहे. सोबतच त्यांनी या वायरस मुळे अन्य मानवामधील बर्ड फ्लू चा देखील धोका बोलून दाखवला आहे कारण तो सर्रास पोल्ट्री मध्ये पसरलेला वायरस आहे. बर्ड फ्लू केवळ भारतातच नव्हे तर युनायटेड स्टेट्स मध्येही चर्चेत आहे. हा संसर्ग त्या देशातील अनेक राज्यांमध्ये गुरांच्या कळपांमध्येही पसरलेला आहे. Avian Influenza: देशातील चार राज्यांमध्ये H5N1 व्हायरसचा प्रादुर्भाव वाढला; केंद्रांने राज्यांना दिल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू करण्याच्या सूचना .

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन च्या माहितीनुसार, avian influenza A(H5N1) स्ट्रेन हा “global zoonotic animal pandemic” बनला आहे आणि अनेक देशांमध्ये हजारो प्राण्यांना त्याचा संसर्ग झाला आहे. H5N1 विषाणू माणसापासून माणसात पसरत असल्याचं कोणतच प्रकरण समोर आलेलं नाही. हा संसर्ग झालेल्या प्राण्यांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांसाठी धोका कायम आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button