
बाप आणि लेकीचं नातं अगदी खास असतं. काळजाच्या तुकड्यासारखा आपल्या लेकीला जपणारा हा बाप अनेक संकटांना सामोरा जात असतो. अगदी जन्म दिल्यापासून ते मोठं होईपर्यंत बाप आपल्या लेकीला सांभाळण्याची, त्याचं रक्षण करण्याची आपली जबाबदारी कधीच विसरत नाही. लहान-मोठ्या सगळ्या संकटात तो आपल्या मुलांबरोबर खंबीरपणे उभा राहतो.
सोशल मीडियावर अनेकदा जंगली प्राण्यांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात वाघाच्या शिकारीचे, हल्ल्याचे अनेक व्हिडीओ आपण पाहतो. वाघाचा व्हिडीओ आणि फोटो बघणं ठीक; पण आपल्यासमोर अचानक वाघ आला तर? अशी परिस्थिती कोणावर ओढवली, तर त्या व्यक्तीची स्थिती तिथेच घाबरगुंडीने अर्धमेल्यासारखी होईल हे नक्कीच. पण सध्या सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात वाघाच्या तावडीतून आपल्या मुलीला वाचवण्यासाठी वडिलांनी कशाचीही पर्वा केली नाही.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून थरकाप उडेल. या व्हिडीओमध्ये एक बाप आपल्या ९ वर्षाच्या मुलीला वाचवण्यासाठी धडपड करताना दिसतोय. वाघाच्या तावडीत आलेल्या आपल्या मुलीला वाचवण्यासाठी तो जीवाचं रान करतो. अगदी त्या वाघाशी जाऊन भिडतो. त्याची मदत करण्यासाठी एक माणूसही पुढे येतो.
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “प्रत्येक मुलीसाठी बाप वाघच असतो” तर दुसऱ्याने “बाप तर बाप असतो” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “बापाचं काळीज शेवटी”