
अवकाशातील ताऱ्याला साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे नाव मिळाले.यंदा अण्णा भाऊ साठे यांची 104 वी जयंती अनोख्या पद्धतीने साजरी केली जाणार आहे.छत्रपती संभाजीनगरमधील उद्योजक सुशील तुपे यांनी या ताऱ्याचे रजिस्ट्रेशन केले आहे.मागील सहा महिन्यांपासून ते यासाठी अथक प्रयत्न घेत होते. त्यांनी इंटरनॅशनल स्टार अँड स्पेस रजिस्ट्री या संस्थेकडे सर्व कागदपत्रांची माहिती पुरवली.image 9यासाठी मोबाईल प्ले स्टोअरमध्ये जाऊन स्पेस रजिस्ट्री किंवा स्टार नेमिंग अॅप्लिकेशनमध्ये डाउनलोड करून त्या अॅप्लिकेशनमध्ये रजिस्ट्री ताऱ्याचा नंबर WVP773557 टाकून पाहता येणार आहे.
1 ऑगस्ट 1920 रोजी सांगलीतील वाटेगाव येथे त्यांचा जन्म झाला होता. पोवाडा आणि लावणी यांसारख्या लोककथात्मक कथा शैलींच्या वापराने लोकांमध्ये ते लोकप्रिय बनले व त्यांचे कार्य अनेक समुदायांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली.जिवंत काडतूस, आबी, खुळंवाडी, बरबाद्याकंजारी (1960), चिरानगरची भुतं (1978), कृष्णाकाठच्या कथा (कथासंग्रह) फकिरा (1959),वारणेचा वाघ (1968), चिखलातीलकमळ, रानगंगा, माकडीचा माळ (1963), वैजयंता ह्यांसारख्या 35 कादंबऱ्यांचे लेखन त्यांनी केले आहे.


