मोबाईल हॉटस्पॉटच्या वादातून फायनान्स कंपनीच्या मॅनेजरची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या

0
228

पुण्यात हडपसर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर मोबाईल हॉटस्पॉटच्या वादातून फायनान्स कंपनीच्या मॅनेजरची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात 4आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींपैकी 3 आरोपी अल्पवयीन आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना रविवारी रात्री उशिरा घडली.खासगी फायनान्स कंपनीत मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या 47 वर्षीय वासुदेव रामचंद्र कुलकर्णी हे घराच्या बाहेरच वॉक करायला निघाले असता मद्यधुंद अवस्थेतील 4 तरुणांनी त्यांच्याकडे हॉटस्पॉट मागितला. या वरून त्यांचे तरुणांशी वाद झाले आणि तरुणांनी वासुदेव यांची निर्घृण हत्या केली.

घटनेची माहिती मिळतातच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.या प्रकरणात सर्व तरुणांना अटक केली आहे. पोलिसांनी सर्व आरोपींना खुनाच्या कलमांखाली अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.