आटपाडी येथे चारचाकी गाडीत आढळला मृतदेह

0
40

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी शहरातील संत सावता माळी महाराज मठामागे बंद असणाऱ्या चारचाकी वाहनामध्ये पुरुष जातीचा मृतदेह आढळल्याने परिसरातून खळबळ उडाली आहे.

याबाबत घटना स्थळावरून मिळालेली माहिती अशी, यातील आटपाडी शहरातील संत सावता माळी महाराज पाठीमागे गेली एक वर्ष चारचाकी गाडी बंद अवस्थेत आहे. याठिकाणी लहान मुले खेळत असताना गाडीमधून वास येत असल्याचे मुलांनी याची माहिती येथील अमित फडतरे यांना दिली.

यावेळी अमित फडतरे यांनी गाडीचे दरवाजे उघडुन पाहिले असता यामध्ये पुरुष जातीच्या पुरुषाचा मृतदेह आढळून आला. सदर घटनेची माहिती त्यांनी आटपाडी पोलिसांनी दिली. पोलीस घटनस्थळी दाखल झाले असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here