माणदेश एक्सप्रेस न्युज : सांगली : सांगली येथील समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद सातारा व अतिरिक्त कार्य्काभर सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग सांगलीच्या श्रीमती सपना सुखदेव घोळवे, वय-४० वर्षे व समाज कल्याण निरीक्षक दिपक भगवान पाटील, वय ३६ वर्षे यांना एक लाख रुपयांची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. यामुळे समाजकल्याण विभागात मोठी खळबळ माजली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, तक्रारदार यांच्या संस्थेस शासनामार्फत भटक्या जमाती क प्रर्वगातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांना शहरांतील इंग्रजी माध्यमांना नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देणे या योजनेअंतर्गत रू. ५९,४०,०००/- अनुदान मंजूर करण्यात आलेले होते. सदर अनुदानाचा पहिला हप्ता २९,७०,०००/- रूपये शाळेस अदा करण्यात आलेला असून सदर रक्कम दिलेचा मोबदला म्हणून १० टक्के व दुसरा हप्ता २९,७०,०००/- रूपये देणेसाठी १० टक्के असे एकुण ५९,४०,०००/- रूपये रक्कमेच्या १० टक्के म्हणजेच सुमारे ६,००,०००/- रूपये लाचेची मागणी अनुदान मंजूर करण्यासाठी केली असल्याबाबतचा तक्रारी अर्ज तक्रारदार यांनी दि.०५.०६.२०२४ रोजी अॅन्टी करप्शन ब्युरो सांगली पथकास दिला होता.
तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक ०५.०६.२०२४ रोजी ब्युरोच्या कार्यप्रणालीप्रमाणे पडताळणी केली असता पडताळणी कारवाईमध्ये, लोकसेविका श्रीमती सपना सुखदेव घोळवे, वय-४० वर्षे जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद सातारा, अतिरिक्त कार्यभार सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग सांगली, वर्ग-१ यांनी तक्रारदार यांचे संस्थेस पहिला हप्ता दिलेचा मोबदला व दुसरा हप्ता मंजूर करण्यासाठी ६,००,०००/- रूपये लाचेची मागणी करून चर्चे अंती ५,००,०००/- रूपये व त्यानंतर २,५०,०००/- रूपये लाचेची मागणी करून पहिला हप्ता १,००,०००/- रूपये लाच रक्कम लागलीच घेवून येण्यास सांगितले. व लोकसेवक श्री. दिपक भगवान पाटील, वय-३६ वर्षे, समाज कल्याण निरीक्षक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग सांगली, वर्ग-३ यांनी तक्रारदार यांचेकडे आश्रम शाळेच्या अनुदानाचे चेक दिलेचा मोबदला म्हणून १०,०००/- रूपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
त्या अनुषंगाने इतर मागास बहुजन कल्याण विभाग समाज कल्याण सांगली या ठिकाणी सापळा लावला असता, सापळा कारवाईवेळी लोकसेविका श्रीमती सपना सुखदेव घोळवे यांनी तक्रारदार यांचेकडे लाचेची मागणी करून लाच रक्कम १,००,०००/- स्विकारल्याने त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. तसेच लोकसेवक श्री. दिपक भगवान पाटील, वय ३६ वर्षे, समाज कल्याण निरीक्षक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग सांगली, वर्ग-३ यांनी तक्रारदार यांचेकडे लाचेची मागणी केल्याने त्यांना देखील ताबेत घेणेत आले आहे.
सदरची कारवाई मा. श्री. अमोल तांबे, पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक, श्री. विजय चौधरी, अपर पोलीस उप आयुक्त/अपर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक श्री संदीप पाटील, श्री. विनायक भिलारे पोलीस निरीक्षक, श्री. दत्तात्रय पुजारी पोलीस निरीक्षक, पोलीस अंमलदार सिमा माने, अजित पाटील, प्रितम चौगुले, सलीम मकानदार, धनंजय खाडे, ऋषीकेश बडणीकर, सुदर्शन पाटील, पोपट पाटील, रामहरी वाघमोडे, राधिका माने, चंद्रकांत जाधव, विना जाधव, चालक अनिस वंटमुरे यांनी केली आहे.
नागरिकांना आवाहन करण्यात येते की, लाच मागणी संबंधाने तक्रारी असल्यास पोलीस उप अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बदाम चौक, सांगली. येथे अथवा कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक ०२३३/२३७३०९५ वर तसेच हेल्प लाईन क्रमांक १०६४ वर तसेच व्हॉट्स अॅप नंबर ७८७५३३३३३३ व मोबाईल नंबर ९८२१८८०७३७ तसेच खालील संकेतस्थळावर संपर्क साधावा.