50 वर्षांच्या नराधमाकडून 13 वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार, तब्बल 7 महिने…

0
700

बदलापूरमधील एका नामवंत शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना काही दिवसांपूर्वीच उघडकीस आली आणि राज्यभरात प्रचंड खळबळ माजली. शाळेतील एका सफआी कर्मचाऱ्याने हे किळसवाणं कृत्य केल्याचे उघड झाले आणि संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. त्यावरून विरोधकांनी राज्यभरात आंदोलनं करत सरकारलाही धारेवर धरलं. मुलींच्या सुरक्षिततेवरून राज्यात रान पेटलेलं असतानाच आता मुलुंडमध्येही असाच एक धक्कादायक घटना घडल्याचे उघडकीस आले आहे.

मुलुंडमध्ये एका 13 वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार करण्यात आला असून 50 वर्षांच्या नराधम इसमाने हे लाजिरवाणे कृत्य केलं आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे गेल्या 7 महिन्यांपासून हा भयानक प्रकार सुरू होता. आरोपी इसम त्या पीडित मुलावर गेल्या 7 महिन्यांपासून लैंगिक अत्याचार करत होता. तो त्या मुलाला घराजवळच्या सार्वजनिक शौचालयात घेऊन जायचा आणि तेथे त्याचे शोषण करायचा. एवढंच नव्हे तर या घटनेबद्दल घरात किंवा बाहेरही इतर कोणालाही काहीही सांगितलं तर तुला आणि तुझ्या कुटुंबाला जीवानिशी मारून टाकेन, अशी धमकीही त्या नराधमाने दिली होती. अखेर आता हा प्रकार उघडकीस आला असून पीडित मुलाने, कुटुंबियांना घटनेची माहिती दिल्यावर त्यांनी ताबडतोब मुलंड पोलिस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत नराधम आरोपीला अटक केली असून त्याच्याविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

खोट्या लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवण्याच्या धमकीनंतर इसमाची आत्महत्या

दरम्यान मुलुंडमध्येच आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. खोट्या लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देण्यात आल्यानंतर एका 67 वर्षीय इसमाने आत्महत्या केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. खुशाल दंड असे मृत इसमाचे नाव असून त्याने 7 ऑगस्ट रोजी धावत्या लोकल खाली उडी घेत आयुष्य संपवलं होतं. याप्रकरणाचा तपास करत मुलुंड पोलिसांनी कुमकुम मिश्रा ( वय 45) नावाच्या महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेला इसम आणि कुमकुम यांच्यात कार पार्किंगच्या जागेवरून वाद झाला होता. तेव्हा त्या इसमाला खोट्या लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवण्याच्या धमकी देण्यात आली. मानसिक त्रासाला कंटाळून आणि बदनामी होण्याच्या भीतीने खुशाल यांनी रेल्वेखाली उडी मारून आयुष्य संपवलं. याप्रकरणाचा तपास केल्यानंतर मुलुंड पोलिसांनी 1 सप्टेंबरला कुमकुम यांना अटक केली. गेल्या आठवड्यात कोर्टाने त्यांना जमीन मंजूर केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here