ताज्या बातम्याव्हायरल व्हिडिओ

स्विमिंगपूलमधील स्टंटमुळे १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू ; पहा व्हिडीओ

मध्य प्रदेशातील रतलाम येथील डॉल्फिन स्विमिंग पूलमध्ये एका 18 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. ही घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे. दुसऱ्या तरुणाने केलेल्या स्टंटवेळी मार लागल्याने तरुणाचा मृत्यू झाला आहे. डोक्याला मार लागल्याने तो बेशुध्द होऊन पूलमध्ये पडला. या घटनेनंतर स्वीमिंगपूल परिसरात मोठी खळबळ उडाली होती. निष्काळजीपणाने तरुणाचा मृत्यू झाल्याचे व्हिडिओ दिसून येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील रतलाम येथील डॉल्फिन स्विमिंग पूलमध्ये ही घटना घडली.अनिकेत तिवारी असं मृत झालेल्या तरुणाचे नाव होते. एक तरुण पूलाच्या पाण्यात उडी घेण्यासाठी वेगात मागून धावत येतो. पंरतु त्याच वेळीस पुलाजवळ बसलेल्या तरुणाला त्याचा पाय अनिकेतला लागते. वेगात असल्याने तरुणाचा पाय अनिकेतच्या डोक्याला लागतो. त्यात तो बेशुध्द होऊन थेट पुलात पडतो. ही घटना झाल्याच्या काही वेळानंतर सुरक्षा रक्षक आणि इतरांनी पुलाजवळ गर्दी केली. घटनास्थळी असलेल्या जीवरक्षकांनी उशिरा प्रतिसाद दिला, परिणामी अनिकेतचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

ही संपुर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होते. अनिकेतला जवळच्या रुग्णालयात दाखल केले परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर अनिकेतच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची कारवाई उशिरा करण्यात आली. या घटनेनंतर परिसरातील अनेकांनी हा स्विमिंग पूल बंद करण्याची मागणी केली आहे.

पहा व्हिडीओ :

x.com/…PressMP/status/1792448729930170811

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button