लक्ष्मीकांत बेर्डेंच्या लेकीला पाहिलत का ?ती सुद्धा आहे एक अभिनेत्री

0
5

मराठी सिनेसृष्टीत सध्या अनेक कलाकार काम करतात. अशीच एक अभिनेत्री सध्या चर्चेत आहे. तिचा एक सिनेमाही आलाय. ही अभिनेत्री मराठी सुपरस्टारची लेक आहे.ही अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून ही आहे अभिनेत्री स्वानंदी बेर्डे… स्वानंदी ही सुपरस्टार अभिनेते लक्ष्मिकांत बेर्डे आणि प्रिया बेर्डे यांची मुलगी आहे.

स्वानंदी सध्या मराठी सिनेसृष्टीत सक्रीय आहे. ‘मन येड्यागत झालं’ हा तिचा सिनेमा काही दिवसांआधी आला होता. या सिनेमातील तिच्या अभिनयाचं कौतुक झालं.
स्वानंदी सोशल मीडियावरही प्रचंड अॅक्टिव्ह असते. साडीतील तिचा हा खास लूक… तिच्या फोटो आणि व्हीडिओंना नेटकऱ्यांची पसंती मिळताना पाहायला मिळतंय.
बडी चंचल पवन है और मै हूँ, म्हणत स्वानंदीने हे खास फोटो शेअर केलेत. तिच्या या लूकला नेटकऱ्यांनी पसंती दिलीय. सुंदर दिसत असल्याचं चाहते म्हणालेत.