तरुणांनी बाईकच्या साहाय्याने उडवले चालू -ट्रेनवर पाणी; संतप्त प्रवाशांनी धु..धु..धुतलं ! (Watch Video)

0
2

पाकिस्तानमध्ये टिकटॉक व्हिडिओ (Tiktok video) बनवणाऱ्या तरुणांना चालू रेल्वेवर पाणी उडवल्याचं चांगलचं महागात पडलं आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात तरुण रेल्वे रुळांच्या खाली तलावात दुचाकी पार्क करून जाणाऱ्या ट्रेनवर पाणी शिंपडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. टिकटॉक व्हिडिओ बनवताना हे तरुण हे कृत्य करत होते. त्यांच्या ट्रेन थांबणार नाही, असं वाटलं. परंतु, त्यांच्या अपेक्षेविरुद्ध ट्रेन थांबवली आणि संतप्त प्रवाशांनी तरुणांना बेदम मारहाण केली. गोंधळ सुरू होताच पोलीस अधिकाऱ्यांनी दुचाकी जप्त केली. तसेच तरुण घटनास्थळावरून पळून गेले. प्रवाशांनी या तरुणांचा पाठलाग करून त्यांना चोप दिला. घटनेचे गांभीर्य असूनही अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

 

पहा व्हिडिओ –

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here