‘या’ लोकप्रिय गायकाच्या वडिलांचे निधन

0
176

ज्येष्ठ संगीतकार विपीन रेशमिया (Vipin Reshammiya) यांचं मुंबई मध्ये निधन झाले आहे. 87 वर्षीय विपीन रेशमिया यांनी 18 सप्टेंबरला अखेरचा श्वास घेतला. दरम्यान विपीन यांचा मुलगा हिमेश रेशमिया (Himesh Reshammiya) यांचं संगीत क्षेत्रातील करियर घडवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. लहानपणापासून त्यांनीच हिमेश यांना संगीताचे धडे दिले आहेत. आज 19 सप्टेंबर दिवशी त्यांच्यावर अंत्यसंकार होणार आहेत.

विपीन रेशमिया यांना श्वसनाचा त्रास होत होता. त्यामुळे मुंबईत एका खाजगी हॉस्पिटल मध्ये त्यांना दाखल करण्यात आले होते. जुहूत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील. विपीन यांच्या निधनावर अनेकांनी शोक व्यक्त केला आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here