‘या’ भाजप नेत्याच्या मुलाकडून वृध्दांना मारहाण, अद्याप कारवाई नाही ;व्हिडीओ होतोय व्हायरल

0
317

उत्तर प्रदेशातील बिजनौर येथे धक्कादायक घटना घडली आहे. भाजपचे नेते बिरबल सिंग यांचा मुलगा अभिनव सिंग यांनी एका वृध्द जोडप्यांना मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना २३ जुलै रोजी घडली होती. वयोवृध्द व्यक्ती निवृत्त बॅंकर असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सिंग वृध्द व्यक्तींना का मारत आहे हे अद्याप समोर आले नाही. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, वृध्द व्यक्तीला मारहाण केले आहे. महिलेला धमकावल्याचे दिसत आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र निषेध व्यक्त केला जात आहे. सिंगवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

नेटकऱ्यांनी दावा केला आहे की, युपी पोलिसांनी या प्रकरणात अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. सिंग यांनी वृध्द महिलेशी देखील गैरवर्तन केले आहे. नेटकऱ्यांनी युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पोस्टमध्ये टॅग केले आहे. पोलिसांनी यावर लवकर कारवाई करा अशी मागणी नेटकरी करत आहे. अभिनव सिंगने एकदा नाही तर पाच वेळा वृद्धाच्या कानाशीला मारली आहे.

पाहा व्हिडिओ: