ताज्या बातम्यागुन्हेमनोरंजन

एक्स बॉयफ्रेंड भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आला,आणि नवरदेवावर हल्ला केला;पहा व्हिडीओ

लग्नाच्या मंडपात वधूच्या एक्स बॉयफ्रेंडने वरावर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आरोपी स्टेजवर चढला होता. वर वधूला त्याने भेटवस्तू देताच हल्ला केला. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना राजस्थान राज्यातील चित्तोडगड जिल्ह्याजवळील भिलवाडा येथे घडली आहे. या घटनेनंतर लग्न मंडपात अशांतात पसरली होती. वरच्या भावाने पोलिसांना या संदर्भात तक्रार नोंदवला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शंकरलाल असं आरोपीचे नाव आहे. वधूचे नाव भारती आहे. शंकरलाल आणि भारती दोन वर्षांपासून प्रेमसंबंधात होते परंतु काही कारणांनंतर दोघे ही प्रेम संबंध तोडले होते. त्यानंतर भारतीचे दुसऱ्या मुलाशी लग्न करायचे ठरवले. हे गोष्ट शंकरलालला राग आला होता म्हणून त्याने हे कृत्य केले असावे असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. लग्नाच्या दिवशी स्टेजवर भेटवस्तू देण्याच्या बहाणे शंकरलाल गेला होता.

त्यानंतर त्याने वरला बुक्कीने मारायला सुरुवात केली आणि त्यानंतर चाकूने देखील हल्ला केला. सुदैवाने पगडी आणि लग्नाचा पोशाख असल्यामुळे वराला गंभीर दुखापत झाली नाही. हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकांनी या हल्लेखोरावर संताप व्यक्त केला आहे. वराच्या भावाने या घटनेची तात्काळ माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी या घटनेची नोंद घेत आरोपीचा शोध सुरु केला आहे.

पहा व्हिडीओ

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button