राष्ट्रीयताज्या बातम्या

मोठी बातमी ! इराणचे राष्ट्राध्यक्ष यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू

नवी दिल्ली : इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला आहे. त्यांच्यासोबत इराणचे परराष्ट्र मंत्र्यांचाही मृत्यू झाला आहे. इराणी माध्यमांनी हा दावा केला आहे.

हेलिकॉप्टरचा ढाचा देखील आढळल्याचे समोर आले आहे. इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या हेलिकॉप्टरचा रविवारी हेलिकॉप्टर अपघात झाला होता. या हेलिकॉप्टरमध्ये इब्राहिम रईसी, परराष्ट्र मंत्री आणि इतर अधिकारी होते. हेलिकॉप्टर अपघातात हेलिकॉप्टर मधील सर्वांचा मृत्यू झाला आहे.

इराणच्या वृत्तसंस्थेने काय म्हटलं आहे?
इराणची सरकारी वृत्तसंस्था असलेल्या आयआरएनएने ही माहिती दिली आहे की अपघात झालेल्या हेलिकॉप्टरचा शोध घेण्यासाठी १६ पथकं कामाला लागली आहे. मात्र खराब हवामानामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. रईसी हे इराणच्या पश्चिम बाघातील अझरबैजान या डोंगराळ भागात सरकारी दौऱ्यावर होते. त्यांच्या ताफ्यात आणखी दोन हेलिकॉप्टर होती जी व्यवस्थित आपल्या ठिकाणी पोहचली आहेत. रईसी यांचं हेलिकॉप्टर कोसळल्याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

कधी घडली घटना?
इराणी वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार ही रियासी यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात रविवारी दुपारी १ वाजता म्हणजे भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३ वाजता झाला. यानंतर शोध मोहीम सुरु करण्यात आली आहे. युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. मात्र धुकं आणि खराब हवामान यामुळे बचावकार्यात अडथळे येत होते.

कोण आहेत इब्राहिम रईसी?
इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा जन्म इराणच्या मशहद शहरात १९६० मध्ये झाला. रईसी यांचे वडील मौलवी होते. रईसी पाच वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं. धर्म आणि राजकारण हे रईसी यांचे आवडते विषय आहेत. महाविद्यालयीन आयुष्यापासूनच त्यांनी आंदोलनांमध्ये आणि विविध चळवळींमध्ये भाग घेतला आहे. इब्राहिम रईसींनी इराणच्या न्याय व्यवस्थेत काम केलं आहे. तसंच अनेक वादग्रस्त निर्णयही त्यांनी घेतले आहेत. १९८८ मध्ये इराणच्या कैद्यांना सामूहिक फाशी देण्यात आली. या निर्णय प्रक्रियेत रईसी सहभागी होते. इराणच्या अध्यक्षपदाची निवडणूक त्यांनी दोनदा लढवली. २०१७ मध्ये ते ही निवडणूक हरले होते. पण २०२१ मध्ये त्यांनी ही निवडणूक जिंकली.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button