गणेशोत्सवामध्ये बाप्पाला मोदक का अर्पण केले जातात? जाणून घ्या यामागील कथा

0
145

मोदक  समोर आला की, आपल्याला सर्वात प्रथम आठवतो तो म्हणजे गणेशोत्सव. दरवर्षी भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. 10 दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवाचा आनंद केवळ भारतातच नाही तर जगभरात पाहायला मिळतो. गणेशोत्सव आणि मोदक हे दोन्ही एकमेकांशी संबंधित आहेत. गणेशोत्सवाबरोबर मोदकांची मागणीही वाढते. घर असो किंवा मिठाईचे दुकान, हे फक्त गणेश चतुर्थीच्या पवित्र सणानिमित्त तयार केले जातात. आज आम्ही तुम्हाला गणपतीला मोदक का अर्पण केले जातात, यामागील कारण सांगणार आहोत.

गणपतीला मोदक का अर्पण केले जातात?

मोदक हे तांदळाचे पीठ, खवा आणि साखरेपासून बनवलेला गोड पदार्थ आहे. पुराणानुसार मोदक हे गणपतीचा आवडता पदार्थ आहे. तथापि, या संदर्भात भिन्न तथ्य देखील आहेत. यामागील एक कथा देवी अनुसूया आणि भगवान शिव यांच्याशी संबंधित आहे. पुराणानुसार, देवी अनुसूयाने भगवान शंकरांना आपल्या घरी भोजनासाठी आमंत्रित केले होते. माता पार्वती आणि भगवान शिव यांच्यासह गणपतीही अनुसूया देवीच्या घरी गेले. या वेळी त्यांचा पहिला विचार गणपतीला खाऊ घालण्याचा होता. यानंतर गणपतीने जेवायला सुरुवात केली. बराच वेळ झाला तरी त्याची भूक शमली नाही.

मात्र, अनुसुईया देवीने गणपतीला मोदक खाऊ घालताच त्यांचे पोट लगेच भरले. तेव्हापासून गणपतीला त्यांचा आवडता गोड पदार्थ म्हणजेचं मोदक अर्पण केला जातो. तथापी, दुसरी कथा भगवान परशुरामाशी संबंधित आहे. पुराणानुसार भगवान परशुराम भगवान शिवाला भेटायला आले होते. यावेळी भगवान शिव झोपले होते आणि भगवान गणेश बाहेर पहारा देत होते. गणरायाने भगवान परशुरामांना दारातच थांबवले. यामुळे ते खूप रागावले आणि गणपतीशी भांडू लागले. भगवान परशुरामांनी बाप्पावर हल्ला केला तेव्हा त्यांचा एक दात तुटला.

त्यामुळे त्यांना अन्न खाण्यास त्रास होऊ लागला. यानंतर माता पार्वतीने त्यांची समस्या सोडवण्याचा मार्ग शोधला. त्यांनी गणपतीसाठी मऊ आणि सहज खाण्यायोग्य मोदक बनवले. हे खाल्ल्यानंतर त्याला खूप आनंद झाला. तेव्हापासून हा पदार्थ त्यांचा आवडता बनला असल्याचे सांगितले जाते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here