का खेळला नाही विराट कोहली बांगलादेशविरुद्धच्या सराव सामन्यात ?रोहित शर्माने सांगितलं कारण

0
13

 

टी20 वर्ल्डकपच्या नवव्या पर्वाची सुरुवात अवघ्या काही तासात होणार आहे. अमेरिका आणि कॅनडा यांच्यात पहिला सामना होणार आहे. भारताचा पहिला सामना आयर्लंड विरुद्ध होणार आहे. हा सामना 5 जूनला होणार आहे.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी भारताने बांगलादेशविरुद्ध सराव सामना खेळला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकून रोहित शर्माने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

भारताने 20 षटकात 5 गडी गमवून 182 धावा केल्या आणि विजयासाठी 183 धावांचं आव्हान दिलं. यात रोहित शर्माने 23, संजू सॅमसनने 1, ऋषभ पंतने 53, सूर्यकुमार यादवने 31, शिवम दुबेने 14, हार्दिक पांड्याने नाबाद 40 आणि रवींद्र जडेजाने नाबाद 4 धावा केल्या.

विराट कोहली या सराव सामन्यात उतरला नाही. त्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटलं. पण कर्णधार रोहित शर्माने त्यामागचं कारण आधीच स्पष्ट केलं आहे. “विराट कोहली कालच आला आहे. त्यामुळे तो या सामन्यात नाही. पण बाकी सर्व खेळाडू सज्ज आहेत.”, असं त्याने सांगितलं.

आयर्लंड विरुद्धच्या सामन्यात विराट कोहली प्लेइंग 11 मध्ये असेल यात काही शंका नाही. त्यामुळे प्लेइंग इलेव्हनमधून कोणाचा पत्ता कापला जाणार हा प्रश्न आहे. विराट कोहली आता थेट आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात दिसणार आहे.

भारत (फलंदाजी 11, क्षेत्ररक्षण 11): रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज , अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल