
माणदेश एक्स्प्रेस/पुणे : पुणे जिल्ह्यातील वढू येथे छत्रपती संभाजी महाराज यांची 336 वि पुण्यतिथी साजरी केली जाते आहे. त्यासाठी उदयनराजे वडू येथे आले होते. यावेळी त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीला अभिवादन केले. सातत्याने होणाऱ्या शिवाजी महाराज यांच्या अवमानावरून त्यांनी सरकारलावर सडकून टीका केली आहे. औरंगजेबाच स्टेटस ठेणाऱ्यांना देशाच्या बाहेर पाठवा. अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
छत्रपती शिवाजी महाराजांचा सातत्याने अवमान होतो त्यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केली जातात. मुख्यमंत्री यांनी यासंदर्भात आमचं सगळं ऐकलं पाहिजे, असे अवमान होत असेल तर सरकारच्या सगळ्यांना कळायला हवं. अवमान आणि दंगलीला कारणीभूत कोण मुख्यमंत्री अन् सरकार काय बोळ्याने दूध पितात का? असं म्हणत उदयनराजेंनी सरकारलाच सुनावले आहे.
उदयनराजे पुढे म्हणाले, ज्या स्वराज्यात आपण सगळे राहतोय त्या स्वराज्याच्या संकल्पना शिवाजी महाराजांची होती. सर्वधर्मसमभाव ही भावना घेत छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळे एकत्र आणलं. लोकशाहीचा ढाचा शिवाजी महाराजांनी रचला. आपल्यातल्या कोणीच देव बघितला नाही. शिवाजी महाराजांच्या रूपाने देव निश्चित आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर अनेक युगपुरुष जन्माला आले त्यांच्या संरक्षण करण्यासाठी कायदे निर्माण झाले. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती महाराज यांच्या संदर्भात अनेकदा मी सांगून सुद्धा कोणतेही कायदे निर्माण झाले नाही. कायदा तयार करायला बजेटची गरज नाही. अवमान करणाऱ्यावर मोकासारखा कायदा आहे. तो लागू झाला पाहिजे,अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
वाघ्या श्वानाच्या प्रकरणावर बोलतांना उदयनराजे म्हणाले,’वाघ्या कोण वाघ्या एकच वाघ होऊन गेला ते म्हणजे शिवाजी महाराज. मुख्यमंत्री यांनी ऐकल पाहिजे सरकारच्या सगळ्यांना कळायला पाहिजे. अवमान आणि दंगलीला कारणीभूत कोण? मुख्यमंत्री आणि सरकार बोळ्याने दूध पितात का? अवमानबाबत त्यांना कळायला हवं’ असं म्हणत त्यांनी सरकारलाच घरचा आहेर दिला.