अधिक विश्वासू सहकारी कोण, शिंदे की अजितदादा? मुख्यमंत्र्यांना प्रश्न….

0
151

माणदेश एक्सप्रेस/मुंबई : २०२४मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाले. यानंतर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा शपथ घेतली. मंत्रिमंडळ, मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटप यांवरून महायुतीत चांगल्याच कुरबुरी झाल्याचे पाहायला मिळाले. नाराजीचे मानापमान नाट्य रंगले. आता पालकमंत्रीपदावरून याच मानापमान नाट्याचा पुढचा अंक पाहायला मिळू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.अशातच अधिक विश्वासू सहकारी कोण, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचक विधान केले आहे.

 

 

मनापासून विश्वास टाकावा असा अधिक विश्वासू सहकारी कोण, एकनाथ शिंदे की अजित पवार, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला होता. याचे उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, तुम्ही माझ्यापुरते विचाराल तर या दोन्ही नेत्यांशी माझे अतिशय जवळचे संबंध आहेत. त्या दोघांचे वेगवेगळ्या लोकांशी वेगवेगळे डायनॅमिक्स असू शकतात. एकनाथ शिंदे आणि माझी जुनी मैत्री आहे. परंतु, अजित पवार यांच्याकडे जी राजकीय परिपक्वता आहे त्यामुळे त्यांची आणि माझी व्हेवलेंथ जुळते, असे देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.